१. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे):
जन्म : ८ नोव्हेंबर १९१९, मुंबई
मृत्यू : १२ जून २०००, पुणे
मराठी साहित्याबद्दल बोलताना डोळ्यांसमोर पाहिलं नाव येत ते म्हणजे पु. ल. देशपांडे. मराष्ट्रामध्ये त्यांना ‘पु. ल. ’ असच संबोधलं जातं. त्यांना ‘भाई ’ या टोपण नावानेही संबोधले जाते. त्यांनी एल. एल. बी. हि पदवी मुंबईत पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी पुण्यातून बि. ए. आणि सांगलीमधून एम. ए. या पदव्या पूर्ण केल्या. त्यांनी कर्नाटक आणि मुबई मध्ये प्रोफेसर म्हणूनही काम केले आहे.
आपल्या खास विनोदी शैलीतून पु.ल. नी मराठी मध्ये खूपसे लिखाण केले. फक्त लेखक म्हणूनच नाही तर त्यांनी अभिनेता, दिग्दर्शक, पटकथालेखक, संगतीकार, आणि नाटककार अशा अनेक रूपांत स्वतःची छाप मराठी साहित्यावर सोडली. त्यांनी मराठीच नाही तर हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
पु. ल. देशपांडे यांची काही प्रसिद्ध पुस्तके:
खोगीरभरती, नस्ती उठाठेव, बटाट्याची चाळ, गोळाबेरीज, पूर्वरंग, असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली, हसवणूक, खिल्ली, कोट्याधीश पु.ल., उरलं सुरलं, पुरचुंडी.
पुरस्कार :
त्यांना त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत.
- पुण्यभूषण – १९९३
- पद्मभूषण – १९९०
- महाराष्ट्र गौरव पुरस्कार
- पद्मश्री – १९६६
- साहित्य अकादमी पुरस्कार – १९६५
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार – १९६७
- संगीत नाटक अकादमी फेलोशिप – १९७९
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार – १९९६
- कालिदास सन्मान – १९८८