ताज्या बातम्या

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती


भारताचे प्रथम उपराष्ट्रपती आणि द्वितीय राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक, दार्शनिक आणि विचारवंत होते. त्यांच्या विद्वत्तेमुळे सन 1954 मध्ये त्यांना भारतीय सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 5 सप्टेंबर ला शिक्षक दिवस साजरा केला जातो. त्यांनी पश्चिमी सभ्येते ऐवजी भारतीय संस्कृतीला संरक्षित करण्याचे प्रयत्न केले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला तामिळनाडू मधील एक छोटेसे गाव तिरुत्तनी मध्ये तेलगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली विरास्वामी आणि आईचे नाव सिताम्मा होते. सर्वपल्ली विरास्वामी गरीब  असूनही विद्वान ब्राह्मण होते. ते राज्याच्या महसूल विभागात कार्यरत होते. त्यांना पाच मुले व एक मुलगी होती. राधाकृष्णन या अपत्यामध्ये दुसरे अपत्य होते. घराची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने राधाकृष्णन यांना लहानपणापासून जास्त सुखसुविधा मिळाल्या नाहीत.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण

राधाकृष्णनन यांचे लहानपण तिरुत्तनी गावातच गेले. तेथूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण प्राप्त केले. पुढील शिक्षण त्यांनी ख्रिश्चन मिशनरी संस्था लुथर्न मिशन स्कूल, तिरुपती येथे सन 1896 पासून 1900 पर्यंत मिळवले. 1900 मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी वेल्लुर मधील कॉलेज मधून शिक्षण ग्रहण केले. त्यानंतर मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून आपले शिक्षण पूर्ण केले. ते लहानपणापासूनच हुशार होते. सन 1906 मध्ये त्यांनी दर्शन शास्त्रात MA केले. राधाकृष्ण अभ्यासात हुशार असल्याने त्यांना आपल्या संपूर्ण शैक्षणिक जीवनात शिष्यवृत्ती मिळत राहिली.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा विवाह –

राधाकृष्णन यांच्या काळात कमी वयात लग्न केले जायचे. 1903 साली 16 वर्षाच्या वयात त्यांचे लग्न सिवाकामू शी करण्यात आले. सिवाकामू चे वडील हे त्यांच्या दूरच्या नात्यातील नातेवाईक होते. 1908 मध्ये त्यांना एक मुलगी झाली. 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन करीयर

1909 मध्ये राधाकृष्ण यांना मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये दर्शन शास्त्राचे अध्यापक म्हणून निवडण्यात आले. सन 1918 मध्ये त्यांना मैसूर युनिव्हर्सिटी द्वारे दर्शन शास्त्राचे प्रोफेसर म्हणून निवडले. त्यानंतर ते इंग्लंड जाऊन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये भारतीय दर्शन शास्त्राचे शिक्षक म्हणून कार्यरत झाले. राधाकृष्णन आपल्या जीवनात शिक्षणाला प्रथम प्राधान्य देत असत. शिक्षणाविषयी असलेल्या त्यांच्या गोडीने त्यांना विद्वान बनून दिले. नंतरच्या काळात ज्या कॉलेज मधून त्यांनी MA केले त्याच कॉलेज चे उपकुलपती त्यांना बनवण्यात आलें.

डॉ. राधाकृष्ण स्वामी विवेकानंद आणि विर सावरकरांना आपले आदर्श मानत असत. त्यांनी विवेकानंद आणि सावरकरांवर गहन अध्ययन केले होते. आपले भाषण आणि लेखनाच्या माध्यमाने त्यांनी संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीशी परिचित केले. राधाकृष्ण बहुआयामी व्यक्तिमत्व असण्यासोबताच भारतीय संस्कृतीशी प्रेम करणारेही होते.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे राजनीतीमध्ये आगमन

ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राधाकृष्णन यांना आग्रह केला की ते विशिष्ट राजदुताच्या रूपात सोव्हिएत संघाच्या राजनैतिक कार्याची पूर्ती करो. नेहरूंची मागणी स्वीकार करत राधाकृष्ण यांनी 1947 ते 1949 पर्यंत संविधान निर्माण सभेचे सदस्य म्हणून कार्य केले. 

13 मे 1952 पासून 13 मे 1962 पर्यंत ते देशाचे उपराष्ट्रपती होते. 13 मे 1962 ला त्यांना भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले. राजेंद्र प्रसाद यांच्या तुलनेत त्यांचा कार्यकाल अधिक आव्हानांनी भरलेला होता. कारण याच दरम्यान भारताचे चीन आणि पाकिस्तान शी युद्ध झाले.

डॉक्टर राधाकृष्णन यांना मिळालेले पुरस्कार

  • राधाकृष्णन यांना शिक्षण आणि राजनीतीचा क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल 1954 साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न देण्यात आला.
  • 1962 ला त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्ष 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केल्या जाण्याची घोषणा करण्यात आली.
  • सन 1962 मध्ये राधाकृष्णन यांना ब्रिटिश अकॅडमी चे सदस्य बनवण्यात आले.
  • 1963 मध्ये त्यांना ब्रिटिश ऑर्डर ऑफ मेरिट चा सन्मान देण्यात आला.
  • 1968 मध्ये साहित्य अकादमी द्वारा त्यांना सभासद बनवण्यात आले. हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले व्यक्ती होते.

 

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा मृत्यू

17 एप्रिल 1975 ला एका दीर्घआजाराने त्यांचा मृत्यू झाला. शिक्षेच्या क्षेत्रात त्यांचे योगदान नेहमी आठवण केले जाते. त्यांना सन्मान म्हणून 5 सप्टेंबर चा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशाच्या श्रेष्ठ शिक्षकांना सन्मानित केले जाते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *