ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

अमोल कोल्हेंच्या मनात नेमकं काय? शिरूर लोकसभा मतदारसंघाची


राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी शिरूर लोकसभा मतदार संघांची ओळख आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाल्यानं शिरूरमध्ये काय समीकरणं असतील, याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. तब्बल तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव अढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एका तर ग्रामीण भागातील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर हा मतदारसंघ कुणासाठी अनुकूल असेल? हा प्रश्न आता निर्माण झालाय. शिरूर लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके आमदार असून त्यांनी तटस्थ भूमिका घेतली.

आंबेगाव मतदारसंघातील आमदार दिलीप वळसे पाटील अजित पवारांसोबत आहेत. खेडचे आमदार दिलीप मोहितेंनीही अजित पवारांची साथ दिलीय. हडपसरचे आमदार चेतन तुपेही अजित पवारांसोबत आहेत. तर शिरुरचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांची साथ दिलीय.

तर भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडी महायुतीच्या पथ्यावर पडणाऱ्या असल्याचा दावा माजी खासदार आढळराव पाटील यांनी केलाय. तर भाजपच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळालं होतं.

मात्र आता अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील भाजप सोबत सत्तेत सहभागी झाल्यानं शरद पवारांसोबत असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोरील आव्हानं वाढली आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्लात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा शिरकाव झाला होता. आता भाजपनंही शिरूर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे अजित पवारांच्या मदतीनं शिरूरमध्ये कमळ फुलणार का? अशी चर्चा सुरू झालीय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *