कबड्डी इतिहास, नियम, प्रकार, स्पर्धा, माहिती भारतातील काही लोकप्रिय खेळांपैकी कबड्डी हा एक खेळ आहे. हा एक सांघिक खेळ आहे. दोन संघामध्ये हा खेळ खेळला जातो. कबड्डी या खेळाला सुमारे चार हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.
मात्र तेवढ्या प्रमाणात हा खेळ प्रसिद्ध झालेला दिसून येत नाही. कबड्डी या खेळात चपळता आवश्यक आहे तसेच या खेळात शक्तीसोबतच रणनीती लक्षात घेणे आवश्यक आहे.
भारतीय मातीत उगम पावलेला हा खेळ आज परदेशात देखील लोकप्रिय होत आहे. हा खेळ भारतात वेगवेगळ्या नावानी ओळखला जातो.
कबड्डी या खेळाचा उगम भारतात झाला आहे. हा सांघिक खेळ आहे. हा दोन संघात खेळला जातो. भारतातील तामिळनाडू या राज्यात सर्वात आधी हा खेळ खेळला गेला. कबड्डी या खेळाला ४००० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.
महाभारत काळात देखील या खेळाचा उल्लेख केलेला दिसून आला आहे. अगदी गौतम बुद्ध देखील मनोरंजन म्हणून कबड्डी हा खेळ खेळत असत असा उल्लेख आहे. असा हा गेल्या काही दशकात प्रसिद्धीस आला आहे.
भारत व भारता बाजूकडील इतर देशात हा खेळ खेळाला जातो. कबड्डी हा बांगलादेश देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. तसेच भारतात देखील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश ह्या राज्यात हा खेळ खेळला जातो.
भारतात ह्या खेळाला वेगवेगळ्या नावानी ओळखले जाते. उदा महाराष्ट्रात या खेळाला हुतूतू म्हणून ओळखले जाते. पश्चिम बंगाल मध्ये कबडी किंवा हा – डू – डू, पंजाबमध्ये कबड्डी, आंध्र प्रदेश मध्ये चेडुगुडू अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
१९३८ मध्ये कोलकात्याच्या राष्ट्रीय खेळांमध्ये कबड्डी या खेळाला समाविष्ट करण्यात आले तर सन 1950 मध्ये अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली.
कबड्डी खेळ कसा खेळला जातो?
कबड्डी हा दोन संघामध्ये खेळला जातो. हा सांघिक खेळ आहे. या खेळामध्ये दोन्ही संघात सात सात खेळाडू असतात. कबड्डी खेळासाठी १२-१३ मीटरचे मैदान आवश्यक असते.
या खेळात गुण मिळण्यासाठी एका संघातील खेळाडूला दुसऱ्या गटात जावे लागते. जो एक खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात जातो त्याला रेडर असे म्हटले जाते.
एका दमात त्याला दुसऱ्या कोर्टातील बचावकर्ते असतात त्यांना स्पर्श करायचा असतो. जास्तीत जास्त प्रतिस्पर्ध्यांना स्पर्श करून परत आपल्या कोर्टात यायचे असते.
रेडर ज्या ज्या स्पर्धकांना स्पर्श करतो ते बाद होतात. त्यांना कोर्टाबाहेर बसावे लागते आणि याचा रेडरला एक गुण मिळतो. रेडर कोर्टात घुसल्यावर जर बचावकर्त्यांनी त्याला पकडले तर त्यांना एक गुण मिळतो.
कबड्डी खेळाचे मैदान
स्त्री आणि पुरुष ह्या दोन्ही संघासाठी वेगवेगळे मैदान असते. पुरुषांसाठी १२.५ मीटर लांब तर १० मीटर रुंदीचे मैदान असते.
तर महिलांसाठी ११ मीटर लांबीचे तर ८ मीटर रुंद मैदान असते. कबड्डी साठी निवडलेल्या मैदानाचे दोन समान भाग करून मध्ये सेंट्रल लाईन (मध्य रेषा) दिली जाते.
कबड्डी संघात किती खेळाडू असतात?
कबड्डी संघात एकूण १२ खेळाडू असतात. त्यामधील सात खेळाडू हे मैदानात असतात आणि पाच खेळाडू हे राखीव खेळाडू असतात.
कबड्डी खेळाचे नियम
आपण पाहिले की फार पूर्वीपासून हा खेळ खेळला जात आहे. परंतु पूर्वीच्या काळी याला काही नियम नव्हते. मनोरंजन म्हणून हा खेळ खेळला जात होता.
सन १९१५-१६ साली सर्वात प्रथम कबड्डी खेळाचे नियम बनविण्यात आले. हे नियम पुणे येथील डेक्कन जिमखाना येथे तयार करण्यात आले आणि त्यानंतर कबड्डी खेळाचे सामने भरवण्यात आले.
पुढे तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेऊन यातील नियमावली पक्की करण्यात आली. या खेळाचे नियम काय आहेत ते आपण पाहू या –
- कबड्डी हा खेळ दोन संघांमध्ये खेळणारा जातो यामध्ये टॉस करून खेळाची सुरुवात केली जाते.
- चाळीस मिनिटांमध्ये हा खेळ खेळला जातो. या 40 मिनिटामध्ये रेडर जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो.
- रेडर एका दमात म्हणजे तीस सेकंदात बचाव करणाऱ्या संघातील स्पर्धकांना बाद करायचे असते. याचेच त्याला गुण मिळतात.
- रेडर हा दोन प्रकारे गुण मिळवू शकतो. १. बोनस पॉइंट – यामध्ये रेडरने स्पर्धकांना बगल देऊन जर बोनस लाईन क्रॉस केली तर त्याला बोनस पॉइंट दिला जातो.
- टच पॉइंट – यामध्ये रेडरने विरोधी संघातील स्पर्धकांना स्पर्श करून आपल्या संघात परत येणे आवश्यक असते. असे केल्यास त्याला एक पॉइंट दिला जातो.
- प्रतिस्पर्ध्यांने जर रेडरला मैदानाबाहेर काढले तर रेडर बाद होतो व विरोधी संघातील खेळाडूना गुण मिळतात.
- जर रेड करणाऱ्या रेडरला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू तीस सेकांडापेक्षा जास्त वेळ त्यांच्या बाजूला अडवून ठेवू शकले तर त्याचा एक पॉइंट त्यांना मिळतो. याला टॅकल पॉइंट असे म्हटले जाते.
- जर एखाद्या वेळी दोन्ही संघाचा स्कोर समान आला तर अशावेळी दोन्ही गटांचे पॉइंट मोजले जातात. आणि जास्त पॉइंट असलेल्या निकषावर टीम विजेता ठरला जातो.