जंजिरा म्हणजे समुद्राने वेढलेला किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये आजही स्थिर आहे. जंजिरा किल्ल्याच्या चारी बाजूला अरबी समुद्राचा परिसर आहे. व या किल्ल्याच्या जवळच मुरुड नावाचे गाव आहे त्यामुळे या किल्ल्याला मुरुड- जंजिरा असे म्हणतात.
जंजिरा किल्ल्याचे बांधकाम आजही भक्कम आहे. व या किल्ल्याच्या तटार सुमारे 572 तोफा आहेत त्यामुळेच जंजिरा किल्ल्याला अभेद्य किल्ला म्हणून ओळखतात. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी व हितासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.
-
जंजिरा किल्ल्याचा इतिहास :
जंजिरा हा किल्ला अनेक काळापासून महाराष्ट्रामध्ये उभारलेला आहे. जंजिरा हा शब्द आरबी भाषेतील जझीरा हा शब्दावरून आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट आणि हा जंजिरा किल्ला चारी बाजूनी समुद्र असलेल्या ठिकाणी असल्याने या किल्ल्याला जंजिरा हे नाव दिले असावे.
असे म्हणतात की, निजामाच्या आदेशावरून बुरहाणखानने जंजिरा किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली होती. पुढे इ.स. 1617 मध्ये अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केले व त्यांना संपूर्ण कष्टाने जंजिरा किल्ला लढवला.
जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण कोणीही यशस्वी होऊ शकला नाही. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जंजिरा किल्ल्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. सन इ.स. 1617 ते इ.स. 1947 अशी एकूण 330 वर्षे हा जंजिरा किल्ला अजिंक्य राहिला.
या किल्ल्यातील सिद्दी सरदारांमुळे हा जंजिरा किल्ला सदैव अजिंक्य राहिला. ह्या किल्ल्याला जिंकण्यासाठी संभाजी महाराजांनी तर या किल्ल्याच्या जवळच पाच- सहा किलोमीटरच्या अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता तरीसुद्धा त्यांना मुरुडचा जंजिरा किल्ला जिंकणे शक्य झाले नाही.
-
जंजिरा किल्ल्याचे ऐतिहासिक निर्देश :
जंजिऱ्या सारख्या अजिंक्य आणि अभेद्य किल्ल्या बद्दलची फार वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. राजापूर गावाच्या खाडी जवळील ऐन तोंडावर एक बेट होते.
अरबी समुद्राच्या उसळणाऱ्या समुद्रात होड्या लोटून मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांनी लुटाऊ लोकांपासून संरक्षण करण्यासाठी राजापूर गावाच्या शाही ठाणे दारांची परवानगी मागून जंजिरा किल्ल्यावर एक मेढेकोट उभारला.
मेढेकोट म्हणजे मोठमोठ्या झाडाचे ओंडके जमिनीत एका पुढे एक रोवून बंदिस्त केलेली जागा होय. रामा पाटील नावाचा व्यक्ती हा त्या कोळी लोकांचा प्रमुख होता.
व त्याचे हे महत्त्वाचे स्थान कालांतराने त्याच्या लक्षात आले. रामा पाटील याने राजापुरीच्या ठाणेदाराला किल्ल्याच्या ठिकाणी बोलवले व त्या लुटेरु लोकांना पकडण्यात आले. त्याच्या या कर्तृत्वा बद्दल सुभेदाराने बादशाहाला कळविले.
-
अजय जंजिरा किल्ला :
कित्येक मोठमोठ्या पराक्रमांनी ह्या किल्ल्यासाठी प्रयत्न केले परंतु हा किल्ला कोणालाही मिळाला नाही. मराठा साम्राज्यांनी सुद्धा 11 वेळा हा किल्ला मिळवण्यासाठी प्रयत्न केला तरी सुद्धा मराठ्यांना जंजिरा किल्ल्यावर ताबा मिळवता आला नाही ही गोष्ट या किल्ल्या बद्दल ची मोठी विशेषता आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे गडकिल्ले आणि जलदुर्गाच्या इतिहासामध्ये मराठ्यांना ज्या किल्ल्यावरती ताबा मिळवता आला नाही तो एकमेव किल्ला म्हणजे हा जंजिरा किल्ला होय.
संभाजी महाराजांनी हा किल्ला मिळवण्यासाठी जंजिरा किल्ल्या पासून पाच ते सहा किलो मीटरच्या अंतरावर पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला तरी पण त्यांना जंजिरा किल्ला मिळवणे अशक्यच झाले.
जंजिरा किल्ला अजिंक्य राहण्याचे कारण म्हणजे ह्या किल्ल्याचे भौगोलिक स्थान, मजबूत तटबंदी, बुरूजे, चारी बाजूंनी असलेला समुद्र, निरीक्षण चौक्या, 572 तोफा, आणि विस्तीर्ण क्षेत्रफळ या वैशिष्ट्यांमुळे हा जंजिरा किल्ला फार काळ अजिंक्य राहिला.
-
जंजिरा किल्ल्या वरील पाहण्यासारखी ठिकाणे :
चारी बाजूंनी समुद्र लाभलेला हा जंजिरा किल्ला पर्यटकांना खूप आकर्षित करतो. जंजिरा किल्ल्याला बुलंद तटबंदी आहे. व 19 बुलंद बुरुज सुद्धा आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या ठेवलेल्या आहे. जंजिरा किल्ल्यावर सुमारे 572 तोफा असल्याची नोंद आहे.
त्यातील कालाल, बांगडी, लांडाकासम, व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. व याच तोफांमुळे या किल्ल्याकडे पर्यटकांचे लक्ष वेधत आहे.
तसेच किल्ल्याच्या मध्यभागी सुरूलखानाचा भव्य वाडा आहे आणि हा वाडा आजही पडक्या अवस्थेत बघायला मिळतो. समोरच दोन मोठे तलाव सुद्धा आहेत. जंजिरा किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा होता.
जंजिराच्या तटबंदीवरुन सभोवतालचा विस्तृत प्रदेश दिसतो. यामध्ये संभाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग दिसतो. तसेच सामराजगड सुद्धा येथून दिसतो. त्यामुळे जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत आहे.