ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

‘.त्यामुळे भाजपने हे पाऊल उचललं असावं’; सुप्रिया सुळे यांचं पत्रकार परिषदेमध्ये मोठं वक्तव्य!


मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकामध्ये जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिवसभर चाललेल्या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्ष सुप्रिया सुळे कॅमेरासमोर दिसल्या नव्हत्या.

अखेर रात्री 11.30 वाजता मुंबईमधील प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी यावर आपल प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

विधानसभा जिंकण्याचा भाजपला विश्वास नसावा त्यामुळे भाजपने हे पाऊल उचललं असावं. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निर्णयाचा अधिकार आहे. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला आहे. गेलेले आमदार माझे सहकारी नाहीतर कुटुंबातील लोक आहेत, ही घटना मला वेदना देणारी आहे. शरद पवार हीच आमची प्रेरणा असून नव्या उमेदीने संघटना उभी करू. नाती आणि कामात गल्लत नको याची जाणीव असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सोडून गेलेल्या आमदारांबाबत आदर अजितदादा माझा कायम मोठा भाऊ म्हणून राहिल. भाजपने राष्ट्रवादीवर केलेल्यावर आरोपांवर भाजपच उत्तर देईल. दादा आणि माझ्यात कधीवाद होऊ शकत नाही. दादा माझ्यापेक्षा मोठा आहे त्यामुळे मी स्वत:च कधीच वाद घालणार नाही. मी कुणाच्या बाजूने नाही, मी पक्षाच्या बाजूने असून कायम पक्षासोबतच असणार आहे. शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत.

काय म्हणाले जयंत पाटील?

राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी पक्षाला कोणतीही कल्पना न देता सत्ताधारी पक्षात जात शपथ घेतली. शरद पवार यांना अंधारात ठेवत ही कृती केली त्यामुळे आम्ही संबंधित आमदारांना अपात्र करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना मेल पाठवला आहे. अध्यक्षांनी आमची बाजू ऐकून घ्यावी, विधानसभेचे अध्यक्ष यांनी लवकरात लवकर आम्हाला बोलवावं. उद्या लवकरात लवकर या पिटिशनसाठी आमची बाजू ऐकून घ्यावी यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती केली आहे. निवडणूक आयोगालाही याबाबत आम्ही माहिती दिली नाही. 9 आमदार म्हणजे पक्ष होऊ शकत नाही, आम्ही सर्व कायदेशीर पावलं उचलली असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *