लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष संतोष तोमर यांच्या नेतृत्वाखात शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिक्षकांना व नक्षलग्रस्त भागात काम करणार्या कर्मचार्यांना 6 व्या व 7 वेतन आयोगानुसार दरमहा 1500 रु प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा.
जिल्हा परिषदेच्या Clerical class सर्व संवर्गातील कर्मचार्यांना अतिरिक्त घरभाडे थकबाकीसह देण्यात यावे. अप्पर सचिव सु. द. आंबेकर यांच्या 1 मार्चच्या पत्रान्वये जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ द्यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष संतोष तोमर, जिल्हा संघटक उमेंद्र मानकर, सरचिटणीस सौरभ अग्रवाल, कार्याध्यक्ष पी. जी. शहारे, नंदलाल कावळे, सहसंघटक प्रकाश रहांगडाले, कोषाध्यक्ष सुभाष खत्री, चतुर्थ श्रेणी कर्मचारी अध्यक्ष भगीरथ नेवारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.