ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चेची शक्यता
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये पोहोचले असून ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेच्या खासदारांना संधी मिळण्याबाबत ते आज चर्चा करण्याची शक्यता आहे.