ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

भगीरथ भालकेंचे ठरले! राष्ट्रवादी सोडून २७ जूनला ‘बीआरएस’ पक्षात प्रवेश करणार


पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे बीएसआर पक्षात प्रवेश करणार आहेत.

भालकेंच्या बीआरएस प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर येथील कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर भालके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आज भालके यांनी २७ जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला येणार आहेत. या दरम्यान सकाळी सरकोली (ता. पंढरपूर) येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. भालके यांनी अधिकृत बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या निर्णयाचे पंढरपूर व मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील स्व. आमदार भारत भालके यांचे पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादला गेले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही भेट झाली होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता. स्व. भारत भालकेंच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाने अपेक्षित सहकार्य केले नाही. आर्थिक अडचणीत असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना बाहेर काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे वारंवार जाऊनही फारशी दखल घेतली नसल्याची खंत भालके यांनी हैदराबादकडे जाताना बोलून दाखविली होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *