ताज्या बातम्या

मैदान तयार, आता वेळ तुमची; पंतप्रधान मोदी यांचे जगातील कॉर्पोरेट क्षेत्रास आवाहन


वाशिंग्टन – भारत आणि अमेरिका सरकार दोन्ही देशांच्या समुदायांसाठी आवश्यक व्यवस्था उभी केली आहे. त्याचा लाभ घेऊन भरभराट करून घेण्याची जबाबदारी उद्योग जगताची आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

वॉशिंग्टनच्या केनेडी सेंटरमध्ये शुक्रवारी भारत आणि अमेरिकेतील व्यावसायिक, समाजसेवक आणि भारतीय-अमेरिकी समुदायातील प्रमुख सदस्य यांची एक परिषद पार पडली. त्यावेळी मोदी बोलत होते.

यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोदी यांनी म्हटले की, “भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी ही दृढ विश्वास, सामायिक दायित्व आणि संवेदना यावर आधारित आहे. संरक्षणापासून विमान वाहतुकीपर्यंत, व्यावहारिक सामग्रीपासून वस्तू उत्पादनापर्यंत आणि आयटीपासून अंतराळापर्यंत व्यापक क्षेत्रात भारत आणि अमेरिका विश्वसनीय भागीदार आहेत. व्यापारी समुदायाने पुढे येऊन या संधीचा पूरेपूर लाभ घ्यावा.’ (वृत्तसंस्था)

गुगल ॲमेझॉन गुंतवणार २ लाख कोटी –

वॉशिंग्टन : गुगल आणि ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन भारतात सुमारे २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि ॲमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी याबाबत माहिती दिली.

‘पंतप्रधानांच्या स्वप्नातून मिळाली ब्लू प्रिंट’
पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे कौतुक करताना सुंदर पिचाई म्हणाले की, त्यांचे डिजिटल भारताचे स्वप्न काळाच्या खूप पुढे आहे. त्यातून इतर देशांना काय करता येईल, त्याची ब्लू प्रिंट मिळते.
सुंदर पिचाई आणि अँडी जैसी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औपचारिक भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पिचाई यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांची भेट ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. भारतात डिजिटायझेशनसाठी १० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ८२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

– गुजरातची राजधानी गांधीनगर येथी गिफ्ट सिटी’ येथे गुगलचे जागतिक फिनटेक केंद्र सरु करण्यात येईल.
– भारतात गुगलचे पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, गुरगाव या ठिकाणी कार्यालये आहेत.

१.२ लाख कोटींची ॲमेझॉनची गुंतवणूक
अँडी जॅसी यानी भारतात आणखी १.२ लाख कोटींची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे सांगितले. ॲमेझॉनने यापूर्वी १ लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. आता ती २.२ लाख कोटी होईल, असे ते म्हणाले,


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *