ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

तेल कंपन्या पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याची शक्यता, पाहा आजचे दर


आज २५ जून रविवारच्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतींसंदर्भात आम आदमीसाठी सक्काळी- सक्काळी चांगली बातमी आहे. तेल विपणन कंपन्यांनी २५ जून साठी पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले आहेत.

या दरात आजही कोणताही बदल झालेला नाही. सलग ४०० दिवस देशातील पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. याचाच अर्थ, सलग १४ महिने पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा थोडी नरमाई दिसून येत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल ७०.५०डाॅलर्स पर्यंत घसरले आहे आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ७५.८३ डाॅलर्सच्या जवळ पोहोचले आहे. जुलै २००८ नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १४० डाॅलर्सच्या उच्चांकावर पोहोचल्या होत्या. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झालेली नाही. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यानंतरही गेल्या १३ महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

महानगरातील पेट्रोल डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७४ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *