ताज्या बातम्या

चहा पिण्याचे फायदे आणि नुकसान


चहा हा असा एक पेय आहे, जो खूप काळापासून चालत आलेला एक पेय आहे. हा पेय भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे.
भारतातील सरासरी बघता ९०% लोक हे दिवसाची सुरवातच चहानी करतात.

काही लोक तर चहाचे इतके प्रेमी आहेत की, दिवसाला ३ ते ४ दा किव्हा त्यापेक्षा जास्त वेळ चहा घेतात. चहा तर आपल्या जीवनातील इतका महत्वाचा भाग झाला की, त्या शिवाय आपण राहूच शकत नाही.

उन्हाळा असो किंवा पावसाळा आपण चहा पिण्याचा एखादा बहाणा( कारण) शोधतोच!
शेवटी चहा ही चीज आहेच वेगळी….

चहा मध्ये कैफिन असून सुद्धा याच योग्य प्रमाणात सेवन केले, तर याचा शरीराला भरपूर लाभ होतो.

जर तुम्ही पण चहाचे प्रेमी(आशिक) असाल तर आज आपण चहा पिण्या बद्दल चे फायदे तसेच नुकसान जाणून घेऊया….!

चहाचे फायदे

  • चहा मध्ये कैफिन आणि टैनिन असतो, जो शरीराला स्फुर्ती प्रदान करतो.
  • चहा मध्ये एंटीजन असतात, जे एंटी-बॅक्टेरियल क्षमता प्रदान करतात.
  • चहा मध्ये असलेला अमिनो-एसिड डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास मदत करतो.
  • चहा मध्ये असलेला फ्लोराईड हाडांना मजबूत करतो व दातांना कीड लागण्यापासून थांबवतो.
  • चहा हे म्हातारपण वाढण्याचा वेग कमी करतो, तसेच शरीर वाढी चे नुकसाना पासून वाचवतो.
  • चहा शरीरातील एंटी- ऑक्सिडेन्स इम्युन सिस्टिम व्यवस्थित ठेवतो. आणि खूप साऱ्या आजारांना दूर ठेवतो.

 

गुळाचा चहा पिण्याचे फायदे

  • गुळामध्ये पुष्कळ पोषक घटक असतात. दररोज गूळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही गुळ खात नसल्यास, गुळाचा चहा अवश्य प्या.
  • गुळाचा चहा देखील आरोग्यासाठी एक अमृतच आहे. थंडीत गुळाचा चहा प्यायल्याने बरेच फायदे होतात.
  • तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, गूळ अनेक रोगांमध्ये औषधापेक्षा चांगले कार्य करतो. गूळ लोहाने(आयर्न) भरलेले आहे आणि त्याचे गुणधर्म पण गरम आहे.
  • ज्यामुळे डोके व पायापर्यंत अनेक रोगांमध्ये गुळाचा चहा खूप फायदेशीर असतो. गुळाच्या चहामध्ये काही आयुर्वेदिक गोष्टी घालून ते औषधासारखे कार्य देखील करते.
  • गुळाचा चहा हा मेटाबॉलिज्म ला वाढवतो.
  • गुळाचा चाय हा कफनाशक असतो.
  • रक्ताची कमतरता असल्यास गुळाचा चहा प्यावा.

    उपाशी पोटी चहा पिण्याचे नुकसान

    • तुम्ही सकाळी उठून उपाशी पोटी चहा पित असल्यास प्रोस्टेट कैंसर सारखा गंभीर आजार होऊ शकतो. जो पुरुषांच्या मध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
    • तुम्ही उपाशी पोटी चहा घेत असाल तर तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते.
    • लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी चहा पिण्यामुळे शरीरात चपळता येते, परंतु हे चुकीचे आहे. रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे दिवसभर थकवा येतो आणि चिडचिड होत.
    • चहामध्ये भरपूर टैनिन असते. रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे कधीकधी उलट्या किंवा मळमळ होऊ शकते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *