आवळ्याला आयुर्वेदात विशेष मानले जाते. कारण आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले हे आंबट फळ विविध पोषक तत्वांचे भांडार म्हणून ओळखले जाते. आवळा हा विविध पद्धतीने खाल्ला जातो. अनेकांना तो कोरडा किंवा कच्चा खायला आवडतो. तर अनेकांना त्याचा रस प्यायला आवडतो. आवळा जरी आकाराने छोटा दिसत असला तरी त्याचे फायदे खूप मोठे आहेत. त्यामुळे दररोज २० मिली आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. चला तर जाणून घेऊया आवळ्याच्या रसाने कोणकोणते फायदे होतात.
आवळ्याचे पोषक तत्व
संशोधनातून असेही सिद्ध झाले आहे की, आवळ्यात वृद्धत्वविरोधी, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-मायक्रोबियल, अँटी-इमेटिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-डायबेटिक, हेपॅटोप्रोटेक्टिव्ह (यकृतासाठी चांगले) आणि हायपोलिपिडेमिक हे (कोलेस्ट्रॉल कमी करते) गुणधर्म असतात. ज्याचा आरोग्यावर उत्तम परिणाम होतो.
थायरॉईड नियंत्रित राहतो
आवळ्यामुळे थायरॉईड नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच केस गळणे थांबवते. एवढेच नाही तर वयानुसार पांढरे होणारे केस देखील पांढरे होत नाहीत. तसेच आम्लपित्त, पुरळ, निस्तेज त्वचा, थकवा, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, गोळा येणे किंवा इतर कोणत्याही जठरासंबंधी समस्यांमध्ये आवळा चांगले कार्य करतो. चला तर जाणून घेऊया रोज आवळा ज्यूस पिण्याचे आरोग्याला काय फायदे होतात.
पचनक्रिया सुधारते
आवळा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. तसेच उच्च रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत होते. यामुळे हृदयासाठी ते चांगले असते.
दमा आटोक्यात राहतो
आवळ्याच्या रसात इतर रसांपेक्षा २० टक्के जास्त व्हिटॅमिन असते. दररोज आवळ्याचा रस प्यायल्याने त्याचा शरीराला फायदा होतो. तसेच दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने आवळ्याच्या रसात मध टाकून प्यायल्याने दम्यासारखा आजार आटोक्यात राहतो.
डोळ्यांची क्षमता सुधारते
डोळे निरोगी राहण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे डोळ्यांची क्षमता सुधारण्यास मदत होते.