विज्ञान कितीही पुढे गेले तर माणसाला अजून तरी मानवनिर्मित रक्ताची निर्मिती करता आलेली नाही.अशा ह्या मानवी शरीराच्या एक शक्तिशाली घटक म्हणजे रक्तामधील हिमोग्लोबिन बद्दल आपण या लेखात पाहणार आहोत.
हिमोग्लोबिन हे शरीराचा एक महत्वाचा घटक आहे.हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रोटिन असते आणि ते रक्त कोशिकेमध्ये स्थित असते.
रक्तामध्ये हिमोग्लोबिन चे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे.आपण ज्या कोणत्याही शारीरिक क्रिया करतो त्या क्रिया योग्य रीतीने घडण्यामागे हिमोग्लोबिन चा महत्वाचा हात असतो.म्हणजे ऑक्सिजन प्रवाहाला संपूर्ण शरीरामध्ये पोहोचवण्यासाठी हिमोग्लोबिन महत्वाची भूमिका बजावते. म्हणजे ऑक्सीजन शरीरात वाहून नेण्याच काम हिमोग्लोबिन करत असते तसेच काही प्रमाणात कार्बन डायक्सोइड वाहून नेत असतो.
आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी झाले तर आपल्याला एनिमिया सारखा आजार होऊ शकतो.एनिमिया झालेल्या रुग्णाच्या शरीरातील रेड ब्लड सेल चे प्रमाण झपाट्याने कमी होते.
शरीराच्या विविध अंगामध्ये ऑक्सिजन व्यवस्थित रित्या पोहचत नाही.एनिमिया झालेला रुग्ण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खचलेला असतो.
एनिमिया आजाराची प्रमुख कारणे :
थकवा जाणवणे,
चक्कर येणे,त्वचा पिवळी पडणे,
श्वास घेताना त्रास होणे,डोके दुखणे,
थंड वाजणे, हृदयाचे ठोके वाढणे,इत्यादी हे एनिमिया आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
एनिमिया आजार होऊ नये यासाठी आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन चे प्रमाण नॉर्मल असले पाहिजे.
हिमोग्लोबिन चे प्रमाण :
हिमोग्लोबिन चे नॉर्मल प्रमाण महिलेत – 12-15 ग्रॅम/ डीएल
हिमोग्लोबिन चे नॉर्मल प्रमाण गरोदर महिलेत – 12-16 ग्रॅम / डी एल
हिमोग्लोबिन चे नॉर्मल प्रमाण पुरुषामध्ये – 14 -17 ग्रॅम / डी एल
6 ते 12 वर्षाच्या बाळांमध्ये असणारे हिमोग्लोबिन चे नॉर्मल प्रमाण – 5 ग्रॅम /डी एल
महिलेमध्ये असणारे हिमोग्लोबिन चे कमी प्रमाण – महिलेमध्ये जर हिमोग्लोबिन चे प्रमाण 12 पेक्ष्या कमी असेल तर त्या महिलेच्या शरीरात आयर्न चे प्रमाण कमी आहे आणि जर महिलेच्या शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण 10 पेक्षा कमी असेल तर त्या महिलेला एनिमिया आजार झालाय.
पुरुषांमध्ये असणारे हिमोग्लोबिन चे कमी प्रमाण – पुरुषांमध्ये जर हिमोग्लोबिन चे प्रमाण 12 च्या खाली असले तर त्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असते.रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी होण्याची कारणे –
संतुलित आहार न घेणे.
पिरिएड्स च्या वेळी नॉर्मल पेक्षा जास्त ब्लिडिंग होणे.
शरीरातील मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स चे प्रमाण कमी होणे.
कमी हिमोग्लोबिन नॉर्मल करण्यासाठी असणारे उपाय :
जेव्हा आपल्या शरीरातील व्हिटॅमिन्स ची संख्या कमी होते तेव्हा आपण जर दवाखान्यात गेलो तर डॉक्टर ब्लड टेस्ट,व्हिटॅमिन बी-9 टेस्ट,व्हिटॅमिन बी-12 टेस्ट आणि व्हिटॅमिन डी टेस्ट करूनच योग्य उपचार करतात.
आपल्या शरीरातील Hematinic एजंट जे की शरीरात रक्त बनवण्याचे काम करतात, ज्यामध्ये फ्लोरिक ऍसिड,आयर्न आणि व्हिटॅमिन B 12 चा सामावेश असतो.हे रक्त बनवणारे एजंट तुम्हाला दिले जातात आणि त्यामुळे हिमोग्लोबिन ची मात्रा वाढून निरोगीराहू शकता
आपण शरीरामध्ये रक्त बनवण्यासाठी लागणाऱ्याची माहिती पाहू :
आयर्न – शरीरामध्ये हिमोग्लोबिन बनवण्यासाठी आयर्न ची आवश्यकता असते. आयर्न रेड ब्लड सेल्स मध्ये असतात. hematinics एजंट ला बाहेरून आयर्न दिल्यामुळे ते हेमातीनिक्स एजंट ते आयर्न शरिरातील भागामध्ये ऑक्सिजन पुरवण्यासाठी मदत करते.
उपचारा दरम्यान दिलेल्या हेमातीनिक्स एजंट मुळे शरीरातील आयर्न ची संख्याही वाढते आणि संपूर्ण शरीरातील भागाला ऑक्सिजन ही पुरवले जाते.
व्हिटॅमिन बी–12 – शरीरातील व्हिटॅमिन बी-12 च्या कमी मुळे आपल्याला थकवा जाणवतो.तसेच आपल्याला अशक्तपणा जाणवतो.शरीरातील व्हिटॅमिन बि-12 च्या कमीमुळे एनिमिया चा धोका होऊ शकतो.
शरीरातील व्हिटॅमिन बि-12 चे प्रमाण कमी झाल्यामुळे ते नर्व्हस डॅमेज करतात आणि आपल्या विचार करण्याच्या शक्तीला weak बनवतात.शरीरामध्ये हेमातीनिक्स एजंट व्हिटॅमिन्स बी-12 चे प्रमाण वाढवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते आणि व्हिटॅमिन्स बि-12 मुळे शरीरातील रेड ब्लड सेल ची संख्या वाढते.
फोलिक ऍसिड – फोलिक ऍसिड शरिरातील स्वस्थ सेल बनवण्यासाठी कामी येते.खासकरून ते रेड ब्लड सेल बनवते.शरीरामध्ये फोलिक ऍसिड चे प्रमाण कमी झाले तर आपले शरीर असामान्य रित्या मोठे रेड ब्लड सेल बनवतात,त्यामुळे ते योग्यरीत्या काम करत नसल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. हेमातीनिक्स एजंट शरीरातील फोलिक ऍसिड चे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करते.
व्हिटॅमिन डी – व्हिटॅमिन्स डी शरीरातील आयर्न ,कॅल्शियम, मॅग्नेशियम,जिंक,फॉस्फेट,इत्यादी बनवण्यासाठी मदत करतात.याच बरोबर व्हिटॅमिन्स डी शरीरातील हाडे बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात.शरीरातील व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी झाले तर आपली हाडे कमकुवत होतात आणि आपल्याला थकवा जाणवतो. हेमातीनिक्स एजंट शरीरातील व्हिटॅमिन डी चे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतात.