कार्याध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे मुंबईत पक्षाचा कार्यालयात आल्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्यांवरुन तोफ डागली. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? मुंबईत महिला सुरक्षेच काम प्रश्न गंभीर आहे. सरकार महिलांबाबत असंवेदनशील आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. महिला सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी गृहखात्याची आहे. राज्याचं काम कोणत्या दिशेने चाललं आहे? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
राज्यातील सत्ताधारी पक्ष जाहीरातींवर पैसा खर्च करण्यात व्यस्त आहे. सेनेचा जाहिरात वाद दुर्दैवी. सत्ताधारी पक्ष आपापसात वाद घालत आहेत. जाहिरात देणारे असे हितचिंतक आम्हीही शोधत आहोत.
होय आम्ही लोकसभेची तयारी सुरु केली आहे. प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील काम म्हणजे टीमवर्क. आमचा पक्ष आहे. आम्ही काय करायचं ते आम्हीच ठरवणार. पक्ष कसा चालवायचा ते आम्ही ठरवणार. संघटना जबाबदारी माझ्यावर आहे. मविआ एकत्र काम करेलं.