ताज्या बातम्या

वेट लॉससोबत हाडंही मजबूत करते स्ट्रॉबेरी, ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल


स्ट्रॉबेरी हे फळ दिसायला जेवळे आकर्षक असते तेवढेच ते खायला देखील चविष्ट असते. रसाळ आंबट-गोड चव असलेली स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. याशिवाय या फळाचा सुगंध त्याला इतर फळांपेक्षा वेगळा आणि खास बनवतो. स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि पॉलिफेनॉल संयुगे असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यात असलेले व्हिटॅमिन-सी त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी देखील उपयुक्त आहे. आजच्या या लेखातून आपण स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. स्ट्रॉबेरी हे लो कॅलरी फळ आहे. तुम्ही वजन कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी खाऊ शकता. फायबर युक्त स्ट्रॉबेरी खाल्ल्यानंतर तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते .कर्करोगासारख्या घातक आजारावर स्ट्रॉबेरी रामबाण उपाय ठरू शकते. एका संशोधनानुसार, स्ट्रॉबेरीमध्ये कर्करोग प्रतिबंधक आणि कर्करोग उपचारात्मक गुणधर्म आहेत जे कर्करोगाच्या प्रतिबंध आणि उपचारांमध्ये प्रभावी परिणाम दर्शवू शकतात. स्ट्रॉबेरी हे हृदयासाठी सर्वात आरोग्यदायी फळ मानले जाते. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा स्ट्रॉबेरी खाण्याची शिफारस केली जाते. स्ट्रॉबेरी तुमचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांपासून संरक्षण करू शकते. स्ट्रॉबेरी दात पांढरे करण्यासाठी नैसर्गिक पर्याय आहे. व्हिटॅमिन-सी-युक्त स्ट्रॉबेरी दातांचा पिवळसरपणा दूर करते आणि दात किडण्यास कारणीभूत असलेल्या एन्झाईम्सची निर्मिती रोखते.हाडे मजबूत ठेवण्यासाठी स्ट्रॉबेरी खूप फायदेशीर ठरते. वाढत्या वयामुळे कमकुवत झालेल्या हाडांचे आरोग्य राखण्यासाठी स्ट्रॉबेरी उपयुक्त मानली जाते. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले मॅग्नेशियम हाडे मजबूत करते. स्ट्रॉबेरीचे खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो. एका अभ्यासानुसार, स्ट्रॉबेरीमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स वयासह स्मरणशक्ती कमी होण्यास प्रतिबंध करतात. तसेच स्ट्रॉबेरीमध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म मेंदूला तणावमुक्त ठेवतात. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका कप स्ट्रॉबेरीमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन-सी आढळते.

स्ट्रॉबेरीमुळे बद्धकोष्ठता देखील दूर होते. स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यास मदत करते. हे पळ पाचनाची समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *