- वांग्यातखूपकमीकॅलरीजअसल्यामुळे एक कप शिजवलेल्या वांग्यातून तुम्हाला 35 कॅलरीज मिळतात. त्यातही पाणी भरपूर असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
- वांगे भूक नियंत्रित करते. कारण वांग्यामध्ये भरपूर फायबर आणि बिया असतात त्यामुळे पोट बऱ्याच काळासाठी भरलेले राहते.
- वांगे हे लोह आणि कॅल्शियमच्या समृद्ध असल्यामुळे अशक्तपणा दूर करण्यासाठी तसेच हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
- वांगी मधुमेह नियंत्रित आणि व्यवस्थापित करण्यासाठी देखील प्रभावी आहे. यामुळे उच्च फायबर आणि लो कार्बची मदत होते.
- वांग्या मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल किंवा एनिमिया सारख्या आजारावर असेलतर वांगी उपयुक्त आहेत तसेच वांग्यामध्ये कॅल्शियम ही मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे तुमचीहाडे मजबूत होतात.
- वांग्यामध्ये असलेले फायबर आणि अँटिऑक्सिडंट घटकांमुळे तुम्हाला कॅन्सर या घटक आजारापासून वाचण्याचे काम करतात. तसेच फायबर असल्यामुळे तसेच कॅलरीज कमी असल्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी वांगी अवश्य खावी
- फायबर, पोटॅशियम, विटामिन बी 6 हे घटक वांग्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला हृदयविकारापासून लांब ठेवते. तसेच कोलेस्टेरॉलचे प्रमाणही संतुलित राहते.