ताज्या बातम्या

खाताय ना मटार! मटार किंवा हिरवे वाटाणे खाल्ल्याने आरोग्याला मिळतात हे 7 फायदे.


मटार खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण मटार जास्त प्रमाणात खाल तर हे काही तोटे सुध्दा आहेतच. चला तुम्हाला मटार आवडत असेल तर हा लेख वाचून लगेच काही गोष्टी समजून घ्या.

हिवाळा सुरू झाला असून भाज्यांमध्ये हिरवे वाटाणे दिसू लागले आहेत. उन्हाळ्यात वाटाणा खाल्ला जात नाही असं नाही पण हिवाळ्यात मटारची चव वेगळीच असते. तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही मटार खाऊन फायबर, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, सेलेनियम, अँटीऑक्सिडंट गुणधर्म, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, झिंक इत्यादी पोषक तत्व असल्याने शरीराला रोगांपासून दूर ठेवू शकतात. तर मटार खाण्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात.

आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की मटार खाण्याचे आरोग्याला कोणते फायदे होतात. 1. रोगप्रतिकारक शक्ती
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरवे वाटाणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हिरव्या मटारमध्ये मॅग्नेशियम आढळतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. ह्याच्याशी संबंधित एक संशोधन देखील समोर आलं आहे, ज्यामध्ये हे सिद्ध होतं की मॅग्नेशियम रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

2. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
तुमचं वजन कमी करण्यासाठी हिरवे वाटाणे खूप उपयुक्त ठरू शकतात. आपण आधी सांगितल्याप्रमाणे, हिरव्या वाटाणामध्ये फायबर आहे. त्याच वेळी, त्यात कॅलरीजचं प्रमाण खूप कमी आहे. अशा स्थितीत मटार खाऊन पोट लवकर भरतच नाही तर वजन वाढण्याच्या काळजीपासूनही आपण दूर राहू शकतो. 3. अल्झायमरपासून संरक्षण होईल
अल्झायमर ही एक मानसिक समस्या आहे, ज्यामागे निद्रानाश, डोक्‍याला कोणतीही दुखापत, वृद्ध होणे इ. अशी अनेक कारणे असू शकतात. अशा स्थितीत स्मरणशक्ती कमी होणे, लेखन-वाचनात अडचण येणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

पण जर तुम्ही मटार खाल तर अल्झायमरच्या आजारावर मात करता येते. पाल्मिटॉयलेथेनोलामाइड, ज्याला फॅटी ऍसिडचा एक प्रकार मानला जातो, हे हिरव्या वाटाणामध्ये असतं, हे अल्झायमर बरा करण्यासाठी उपयुक्त आहे. 4.सांधेदुखीत मटार आहेत फायदेशीर
सांधेदुखी दूर करण्यासाठी हिरवे वाटाणे किंवा मटार तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. कारण हिरव्या मटारमध्ये सेलेनियम आहे जे संधिवात बरा करण्यासाठी उपयुक्त आहे. तर सांधेदुखीचा त्रास दूर करण्यासाठी थंडीत मटार नक्की खा.

5 .हाडांना ताकद द्या
आजकाल लोक हाडांच्या समस्येने खूप त्रस्त आहेत. तुमची हाडं दुखतात का? तर हाडांचं दुखणं दूर करण्‍यासाठी हिरवे वाटाणे खूप उपयोगी ठरू शकतात. हिरव्या मटारमध्ये कॅल्शियमच नाही तर मॅग्नेशियम, झिंक आणि व्हिटॅमिन सी आहे. ह्यातून हाडांना आवश्यक पोषक तत्त्वच मिळत नाहीत तर मटारमध्ये आढळणारे व्हिटॅमिन के हाडांशी संबंधित अनेक त्रासापासून तुमचं रक्षण करेल.6. डोळे निरोगी ठेवा
मटार मध्ये आपल्यासाठी आवश्‍यक खनिजे असतात जी डोळ्यांशी संबंधित अनेक आजार दूर ठेवू शकतात. ह्याच्याशी संबंधित एक संशोधन देखील समोर आलं आहे, ज्यामध्ये असं दिसून आलं आहे की हिरवे वाटाणे डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. म्हणून तुम्हाला निरोगी डोळे हवे असतील तर हिरवे वाटाणे खा. ते दृष्टी वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहेत.

7. पचनशक्ती मजबूत बनेल
हिरवे वाटाणे पचन संस्था मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. कारण मटारच्‍या आत फायबर असतं, जे पचनासाठी उपयुक्त आहे. मटारच्‍या आत आढळणारे अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म आणि गॅलेक्‍टोज ऑलिगोसॅकराइड असतात, जे पचनक्रिया सुदृढ करण्‍यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. मात्र आधीच अपचन झालं असेल तर मटार शिजवून आणि कमी प्रमाणात खा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *