टोमॅटोचे आहारात विशेष औषधी महत्त्व नसले तरी त्याच्या सुधारित जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चव यांमुळे सर्व हॉटेलांत, शहरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा तोंडी लावण्यासाठी व कोशिंबिरी मध्ये सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राय (बटाट्याचे तळलेले उभे तुकडे) वा बटाटा चिप्सबरोबर टोमॅटो केचप देण्याची रीत आहे. टोमॅटोमध्ये ‘अ’ (०.६४%) व ‘क’ (२.८२%) जीवनसत्त्व असते. ‘लायकोपिन’ या घटकामुळे टोमॅटोस लाल रंग येतो. टोमॅटोपासून पेस्ट (प्यूरी) व त्यापासून टोमॅटो सूप, केचप, ज्यूस, टोमॅटोपुरी लोणचे इत्यादी पदार्थ तयार करतात. टोमॅटोची चटनी भारतात खूप लोकप्रिय टोमॅटोची चटणी आहे सुद्धा खूप कमी वेळात बनते. ही चटनी लोक नाश्टा मध्ये सामोसा, बटाटा वडा, भजी, डबलरोटी इत्यादी बरोबर आवडीने खातात. तसे टोमॅटोची गोड चटणी टोमॅटो कैचप किंवा सॉसच्या रूपात साधारण बाज़ारात मिळते. आता तर याचा व्यावसायिक दृष्टि ने उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे.याचे जास्त उपयोग नाश्ट्याची चटणी बनविण्यासाठी होतो.