आपल्या रोजच्या वापरातील सर्वांना परिचित असणारी पालेभाजी म्हणजे मेथी होय. याचा उपयोग औषधी म्हणूनही केला जातो. तसेच मेथी ही सॅलड मध्ये खूप जास्त प्रमाणात आवडीने खाल्ली जाते. मेथी पासून अनेक पदार्थ बनविले जातात. ते खायला सुद्धा खूप छान लागतात. तसेच मेथीचा अनेक प्रकारे वापर केला जातो. तसेच मेथी विषयची बरीच माहिती आहे, आणि ते आता आपण समोर बघणार आहोत. मेथीची लागवड सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला करतात. मेथीच्या लागवडीसाठी मध्यम स्वरूपाची जमीन लागते. मेथीचे लहान व मोठी असे दोन प्रकार आहेत. आणि मेथीला जानेवारी ते मार्चमध्ये फुले येतात.
मेथी या झुडपाची पाने भाजी करण्यासाठी रोजच्या जेवणात वापरतात. लहान पानांची मेथीची भाजी नेहमी वापरात आणली जाते. तर मोठ्या पानांची मेथी काही ठिकाणी जनावरांना चारा म्हणून वापरली जाते. ती चवीला जरा कडुसर असते. शेतकरी लोक मेथीची लागवड करतात, किंवा आपल्या दारात जर थोडीशी जागा असेल तर तेथेसुद्धा मेथीची लागवड ही करता येते. मेथीचे विविध उपयोग –
मेथी या झुडपाचे सर्व भाग उपयोगी पडतात. जसेकी मेथीच्या पानांचा उपयोग भाजी करण्यासाठी तसेच किंवा गव्हाच्या पिठात मेथीची पाने घालून पराठे तयार करण्यासाठी केला जातो. तसेच मेथीच्या कोवळ्या पानांचा उपयोग हा घोळाणा करण्यासाठी सुद्धा केला जातो. मेथीच्या झाडांना येणारी फळे म्हणजे मेथ्या होय. त्यांचा सुद्धा उपयोग स्वयंपाकात आणि औषधी म्हणून केला जातो. स्त्रिया मसाला तयार करताना मेथ्या वापरतात. अळू, चुका, पालक वगैरे भाज्यांची पातळ भाजी करताना फोडणीसाठी मेथ्या वापरतात, तसेच जाडसर हिरव्या मिरच्या मधोमध चिरून त्यात मेथीपूड, दही व मीठ मिसळून त्या उन्हात वाळवून नंतर तळून त्या खायला फार रुचकर लागतात. मेथीचे औषधी उपयोग –
मेथीचा उपयोग हा औषधी सुद्धा म्हणून केला जातो. बाहेरून लावण्यासाठी व पोटात घेण्यासाठी मेथ्याचा उपयोग होतो. मार लागून सूज आली व वेदना होत असतील तर मेथ्या पाण्यात वाटून तो लेप गरम करून दुखणाऱ्या भागावर लावावा म्हणजे छान असा आराम मिळतो.
तसेच मेथ्या ह्या कफनाशक आणि वातनाशक म्हणून वापरल्या जातात. अन्नाचे पचन नीट न होणे, भूक मंदावणे, पोट साफ न होणे अशा त-हेच्या पचनसंस्थेच्या तक्रारींवर सुद्धा मेथ्याचे चूर्ण हे फार उपयोगी असते. वातामुळे हात, पाय दुखत असतील तर मेथीचे चूर्ण तुपात घालून खावे. म्हणजे ज्यानेकरून उत्कृष्ठ असा आराम मिळतो.
मेथीच्या बियांचे म्हणजेच मेथ्यांचे लाडू करतात. हे लाडू स्त्रीची प्रसूती झाल्यानंतर बाळंतीन स्त्रीला देतात; त्यामुळे अंग दुखणे, मलावरोधादी आजार कमी होतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा मेथ्यांचे सेवन वरचेवर करावे. वयस्कर स्त्रीपुरुषांचे गुडघे दुखत असतील तर मेथीचे चूर्ण पाण्याबरोबर खावे म्हणजे गुडघेदुखी याला आराम मिळतो. आव झाली असता मेथ्यांचे चूर्ण दह्यात कालवून घेतले की छान असा आराम मिळतो.