धनादेश व वटल्या प्रकरणातुन सी.ए. गोविंद बियाणी यांची निर्दोष मुक्तता.
बीड : प्रकरणातील फिर्यादी प्रकाश गोरकर हे पुर्णवादी बँक बीड येथे कर्मचारी होते, व बियाणी हे सी.ए.असल्यामुळे त्यांची पुर्वीपासुन ओळख व चांगले संबंध होते. सन- २०१४ मध्ये बियाणी यांनी त्यांच्या मोंढ्यातील सी.ए. च्या ऑफिसचे नुतनीकरण करण्यासाठी त्यांना पैशाची गरज होते त्यासाठी त्यांनी फिर्यादीमार्फत पुर्णवादी बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे व विश्वासाने कोरे धनादेश दिले.परंतु कर्जासाठी वेळ लागेल असे फिर्यादीने बियाणी यांना सांगितले व तोपर्यंत माझ्याकडुन कर्जाऊ पैसे घ्या. फिर्यादी यांना पैशाची तात्काळ गरज असल्याने त्यांनी फिर्यादीकडुन पैसे घेतले व नंतर मुदतीत ते व्याजासह परत केले. परंतु फिर्यादी यांना बियाणी यांनी कर्जासाठी दिलेले कागदपत्र व कोरे धनादेश परत घेण्याचे लक्षात आले नाही. दरम्यानचे काळात बियाणी यांची पत्नीचे नावे असलेल्या वरद ऑईल इंडस्ट्रीजमध्ये सरकी पेंड खरेदी विक्री व्यवहारात फिर्यादीने काही रक्कम गुंतवली त्यासाठी फिर्यादीने वरद ऑईल इंडस्ट्रीजच्या नावे त्यांचे खाते असलेल्या महेश अर्बन को. ऑप. बँक लि. शाखा- बीड या बँकेतुन धनादेशाद्वारे काही रक्कम दिली होती. परंतु तो व्यवहार पुर्ण न झाल्याने फिर्यादीने बियाणी यांना मध्यस्थी गृहीत धरुन, बियाणी यांनी फिर्यादीस पुर्णवादी बँकेत कर्ज प्रकरण करण्यासाठी जे कोरे धनादेश दिले होते त्याचा गैरवापर करुन त्यापैकी अॅक्सीस बँक शाखा-बीड येथील धनादेश क्र.०३२३७३ हा दिनांक १०-०१-२०१५ रोजी फिर्यादीने बँकेत जमा करुन अनादरीत केला व बियाणीयांच्याविरुध्द मा. बीड येथील न्यायालयात कलम १३८ एन. आय. अॅक्ट प्रमाणे प्रकरण दाखल केले ज्याचा एस.सी.सी.क्रं.३८४/२०१५ असा होता.
सदरचे प्रकरणात फिर्यादी प्रकाश गोरकर व बियाणी यांचे साक्षी पुरावे होऊन त्यात मा. ४ थे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मा. श्री. अविनाश पाटील साहेब यांनी श्री. गोविंद बियाणी यांचा बचाव ग्राह्य धरत त्यांची प्रकरणातुन निर्दोष मुक्तता केली. सदरचे प्रकरणात श्री. गोविंद बियाणी यांच्या वतीने अॅड. संदिप जोगदंड यांनी काम पाहिले, त्यांना अॅड. विजय पंडीत, अॅड.सखाराम रुचके, अॅड. सागर नाईकवाडे, अॅड. सतिष गाडे, अॅड. राजेश जाधव, अॅड. विवेक डोके व अॅड. सचिन लंगे यांनी मोलाचे सहकार्य केले.
अँड.एस.पी. जोगदंड, बीड.