ताज्या बातम्या

पाऊस गेला पण आता उकाडा करणार घायाळ, विदर्भ 43 पार


राज्यात मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे काही दिवस वादळी पाऊस थांबणार आहे.

परंतु वादळी पावसाने तुर्तास विश्रांती घेतली असली तर उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भात सुर्य तळपू लागल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे उष्माघाताचा त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

विदर्भात सध्या 43 अंश तापमान वाढ झाली आहे. आज (दि. 20) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात कडक उन्हाळा जाणवू लागला असून, राज्यात मागच्या 24 तासांत चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

गोंदिया, ब्रह्मपुरी, वर्धा आणि यवतमाळ येथे तापमान 43 अंशांच्या पार गेले आहे. तर अकोला, अमरावती, वाशीम येथे तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर सरकला आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान 34 ते 42 अंशांच्या दरम्यान असून, किमान तापमान 19 ते 27 अंशांच्या दरम्यान आहे.

कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. आज (ता. 20) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा कायम आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

यंदाचा उन्हाळा अंगाची लाहीलाही करणारा! इतिहासात पहिल्यांदाच एप्रिल इतका उष्ण, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 39.2 (20.4), जळगाव 41.6 (22.5), कोल्हापूर 39.1 (24.2), महाबळेश्वर 32.8 (19.4), नाशिक 39.1 (21.8), निफाड 40.2 (18.2), सांगली 39.6 (24.1), सातारा 38.8 (23.7), सोलापूर 41.8 (25), सांताक्रूझ 37.1 (25.6), डहाणू 35.5 (25.5), रत्नागिरी 34.1 (25.1), छत्रपती संभाजीनगर 39.8 ( 22.5), परभणी 41.7 (25), अकोला 42.8 (23.8), अमरावती 42.8 (24.1), बुलडाणा 39.2 (24), ब्रम्हपुरी 43. 2 (27.2), चंद्रपूर 43.6 (25.0), गडचिरोली 40.6 (24), गोंदिया 43.2 (26.5), नागपूर 41.2 (25.9), वर्धा 43 (23), वाशिम 42 (21.6), यवतमाळ 43 (24) तापमानाची नोंद झाली.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *