साई बाबांविरोधातील ‘त्या’ विधानावर धीरेंद्र शास्त्रींनी व्यक्त केली दिलगीरी काय म्हणाले?
शिर्डीच्या साई बाबांविरोधात केलेल्या विधानावरुन मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर आता स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरु धीरेंद्र शास्त्रींनी दिलीगरी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून त्यांनी सविस्तर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मेरा हमेशा संतों के प्रति महापुरुषों के प्रति सम्मान है और रहेगा मैंने कोई एक कहावत बोली जो हम अपने संदर्भ में बोल रहे थे कि अगर हम छतरी पीछे लगाकर कहें कि हम शंकराचार्य हैं तो ये कैसे हो सकता है…हमारे शंकराचार्य ने जो कहा वो हमने दोहराया कि साईं बाबा संत फ़क़ीर हो सकते हैं और… pic.twitter.com/aHWnC0Leal
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) April 5, 2023
धीरेंद्र शास्त्रींनी काय म्हटलं?
धीरेंद्र शास्त्रींनी म्हटलं की, “मी कायम संत आणि महापुरुषांचा सन्मान केला आहे आणि कायम करत राहिन. मी एक गोष्टी सांगत होतो जी माझ्या संदर्भात होती. यात मी म्हटलं होतं की, जर मागे छत्री लावून मी स्वतःला शंकराचार्य कसं काय म्हणू शकतो? आपल्या शंकराचार्यांनी जे सांगितलं त्याचाच मी पुनरुच्चार केला की साईबाबा संत फकीर असू शकतात तसेच त्यामध्ये लोकांची आस्था असेल त्याप्रमाणं कोणती व्यक्ती कोणत्याही संत गुरुला वैयक्तीकरित्या आस्थेनं देव मानत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. याला आमचा विरोध नाही. माझ्या कुठल्याही शब्दांनी कोणाच्या मनाला ठेस लागली असेल तर त्याचा मी अंतकरणापासून दुःख आणि खेद व्यक्त करतो”
साई बाबांविरोधात काय केलं होतं विधान
जबलपूर इथल्या एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रींनी विधान केलं होतं की, “संताची पूजा करायची तर हिंदूंमध्ये संत कमी आहेत का? तुलसीदास, सूरदास किंवा इतर कोणतेही संत असोत ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरुष आहेत. परंतू ते ईश्वर नाहीत, त्याचप्रमाणं साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात मात्र ईश्वर नाही”