अनैतिक संबंधांना विरोध केल्यानं पती आणि सासरच्यांनी मिळून सरिताची हत्या करून तिचा मृतदेह जमिनीत गाडून टाकला. ८ मार्च रोजी ही घटना घडली परंतु २३ दिवसांनंतर शुक्रवारी कुत्र्यांनी दुर्गंधी येत असल्याने जमिनीची माती बाहेर काढली तेव्हा हा खून उघडकीस आला.
सरिताला आपल्या पतीचे कुटुंबातील एका महिलेसोबत अवैध संबंध असल्याचा संशय होता असं पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली.
पतीच्या या कृत्याला तिचा विरोध असायचा, या गोष्टीवरून अनेकदा तिचं पतीशी भांडण व्हायचे. या प्रकरणी पोलिसांनी सरिताचा पती जोगेंद्र उर्फ लाला, सासू संता आणि वहिनी उषा यांना अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. ग्रेनो वेस्टमधील तुस्याना गावात राहणाऱ्या हरिओमची मुलगी सरिता हिचा विवाह डेरी कंबक्सपूर गावातील रहिवासी जोगेंद्रसोबत १६ फेब्रुवारी २०१५ रोजी झाला होता. सरिता ८ मार्च रोजी बेपत्ता झाली होती. ९ मार्च रोजी जोगिंदरने नॉलेज पार्क पोलिस ठाण्यात पत्नी सरिता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून तपास सुरू केला.
दुसरीकडे सरिताचा भाऊ नरेंद्र याच्या फिर्यादीवरून १५ मार्च रोजी पती जोगेंद्र, सासू सांता, दीर भूपेंद्र, वहिनी उषा, चुलत सासरे विजयपाल आणि इतर यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जोगेंद्रचे कुटुंबीयांतील एका महिलेशी अवैध संबंध असल्याचा सरिताला संशय असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पतीला तिचा विरोध होता. यावरून अनेकदा वादही झाले. मध्यरात्री जोगेंद्रने सरिताचा गळा आवळून खून केल्याचे आरोपींनी पोलिसांना कबुली दिली. जोगेंद्रसह भाऊ भूपेंद्र, वहिनी उषा आणि आई सांता यांनी त्याचा मृतदेह लपवला.
१२ मार्च २०२१ रोजी जेव्हा सरिताने पतीच्या अवैध संबंधांना विरोध केला तेव्हा तिच्यावर हल्ला करण्यात आला. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एनसीआरची नोंद केली होती. आरोपींनी फावड्याने खड्डा खोदून मृतदेह जमिनीत पुरला होता. हा फावडा पोलिसांनी जप्त केला आहे.
मृतदेह लपवून पोलीस आणि ग्रामस्थांची दिशाभूल
सरिताचा मृतदेह जमिनीत गाडल्यानंतर आरोपी बेधडकपणे त्यांच्या घरीच राहिले. आरोपी जोगेंद्रने दुसऱ्या दिवशी बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. सरिता मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असे, असे सांगून आरोपी पोलिस व गावकऱ्यांची दिशाभूल करत होता. ती त्याच्यासोबत गेली असावी. आरोपींनी सरितावर खोटे आरोप करण्यास सुरुवात केली. मातृपक्षाचा अहवाल नोंदवूनही पोलिसांनी आरोपींची अनेकवेळा चौकशी केली मात्र आरोपी खोटे बोलतच होते.हत्येनंतर महिलेवरच प्रश्न उपस्थित
आरोपी सासरच्या लोकांनी सरिताच्या हत्येनंतर तिच्या चारित्र्यावर बोट दाखविल्याचा आरोप आहे. आरोपी गावातील लोकांना ती कुणासोबत पळून गेल्याचं सांगत होते. माहेरच्यांनी याचा खुलासा करण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याकडे मोबाईलचा सीडीआर वगैरे तपासण्याबाबतही बोलले.याप्रकरणी महिलेच्या हरवल्याची नोंद यापूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर अपहरण आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आता खून आणि मृतदेह लपवून ठेवण्याच्या कलमात वाढ करण्यात येणार आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.,,