पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार केले जात असल्याचे स्मशान भूमित भासवून मद्य तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बिहारच्या मुझफ्फरपूरच्या पोलीस स्टेशन परिसरात बिअर आणि स्मशानभूमीच्या नावाखाली अवैध दारूचा खेळ सुरू होता. पोलिसांनी याठिकाणी छापला टाकला मात्र, तस्करांना येथून पळ काढल्याने त्यांना पकडता आले नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण
प्रत्येक गावाप्रमाणे मुझफ्फरपूरच्या माधोपूर सुस्ता गावात स्मशानभूमी आहे. येथे काही लोक स्मशानभूमीत प्रतिकात्मक पार्थिव शरीर बनवून ‘राम नाम सत्य है’ असे म्हणत स्मशानभूमीमध्ये येत.
मात्र, घाटाजवळील झाडाझुडपांच्या मधोमध असलेल्या भट्टीत प्रतिकात्मक अर्थीवर दारू बनविण्याचे सर्व साहित्य स्मशानभूमीपर्यंत पोहोचवले जात होते. तसेच तिथे दारू तयार केली जात होती. याठिकाणी पोहचल्यावर तासा-दोन तासांत दारू तयार करून हे लोक रात्री छुप्या पद्धतीने बाहेर पडत असत.
दरम्यान, माधोपूर सुस्ता येथील ग्रामस्थांना संशय आला होता.तस्कर हे अवैध दारू स्मशानभूमीत नेण्यासाठी निघालेली प्रतिकात्मक पार्थिव जवळपास रोज संध्याकाळी बाहेर घेऊन जाऊ लागले. यावेळी दररोज ही अंतिम यात्रा निघत असल्याने काही जणांना संशय आला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. एक महिन्यापासून दररोज ही प्रतिकात्मक अंतिम यात्रा निघत होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी रात्री उशिरा छापा टाकून स्मशानभूमीजवळील झुडपातून दारू बनवण्याचे साहित्य जप्त केले. मात्र, यावेळी तस्कारांनी येथून पळ काढला. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असून दारू तस्कारांचा शोध घेतला जात आहे.