क्राईमताज्या बातम्या

Video:मुलीच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते,नवविवाहित जोडप्याचं सिनेस्टाईल अपहरण


जयपूर : जयपूरमध्ये काही लोकांनी एका नवविवाहित जोडप्याला दिवसाढवळ्या मारहाण करून पळवून नेल्याची घटना घडली

मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर दोघांनी 10 मार्च रोजी लग्न केले होते. मुलीच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. दरम्यान रविवारी मुलीचे नातेवाईक कार घेऊन जयपूरच्या हरमदा भागात पोहोचले आणि तिथे किरायाच्या घरात राहत असलेल्या नवविवाहित जोडप्याला त्यांनी सार्वजनिकरित्या बेदम मारहाण केली.

 

1ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यानी दोघांनाही फरपटत नेत गाडीत टाकले आणि त्यांचे अपहरण करत पळवून नेले. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात अपहरण करण्यापूर्वी मुलीच्या कुटूंबियांनी दोघांना मारहाण केल्याचे आणि फरपटत नेऊन अपहरण केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

जयपूर जिल्ह्यातील जामवरमगड येथे राहणारा 22 वर्षीय पृथ्वीराज हा फायनान्सचा व्यवसाय करतो. अनेक वर्षांपूर्वी तो त्याच्यापेक्षा एक वर्ष लहान असलेल्या पूजा योगीच्या प्रेमात पडला होता. पूजा योगी दोडाका ही डुंगर गावची रहिवाशी आहे.

नवरदेवाच्या वडिलांनी सांगितला घटनाक्रम

पृथ्वीराजचे वडील रामलाल यांच्या म्हणण्यानुसार दोघांनी अनेक वर्षांपासून पूजाच्या घरच्यांना लग्नासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मान्य केले नाही. यानंतर 10 मार्च रोजी दोघेही घरातून पळून गेले आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे आर्य समाज मंदिरात लग्न केले, असे रामलाल यांनी सांगितले. तसेच पूजाचे कुटुंबीय या लग्नामुळे खूप नाराज होते. लग्नानंतर दोघांनी हरमडा परिसरात भाड्याने घर घेतले होते आणि तेथून त्यांचे अपहरण झाले अशी माहिती त्यांनी दिली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *