प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ चित्ररथावर साकारण्याचे काम दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरु आहे.
यावर्षीच्या चित्ररथ संकल्पनेत ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यांची निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते. यंदा प्रजासत्ताकदिनी कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर,
माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तश्रृंगी देवीची प्रतिकृती या चित्ररथात असणार आहे. नुकतंच या रथाची प्रतिकृती समोर आली समोर आली असून, यातून पथसंचलनात कश्या पद्धतीचा चित्ररथ असणार आहे हे दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर देखील याचे फोटो व्हायरल होत आहेत.