क्राईमताज्या बातम्या

बसने दुचाकीला उडवले दुचाकीस्वार जागीच ठार


संगमनेर : पुणे नाशिक हायवेवर दुचाकीस्वाराला जोराची धडक देत भाऊसाहेब पांडुरंग बिडकर वय.38 रा. शिंदोडी ढोनवाडी या युवक तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर माहिती अशी कि पुणे नाशिक महामार्गावर दुचाकीस्वार हा आपल्या एम. एच.17 सी.एफ.3972 बजाज सिटी 100 वरून जात असताना राजस्थान येथील बसने दुचाकीस्वारास उडवले असता, अपघातात मयत झालेल्या इसमाच्या खिशात आधार कार्ड भेटले असता तो ईसम संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावातील ढोनवाडी येथील असल्याची माहीती समोर आली आहे. राजस्थान येथील लक्झरी बस क्रमांक आर. जे. 09 पी. ए. 5069 ने जोरात उडवून देत दुचाकीला लांबवर फेकून देत दुचाकीस्वाराला दुदैवी घटनेला सामोरे जावून आपला जीव गमवावा लागला. सदरील घटनास्थळी माऊली अंम्बुलनस तातडीने घटनास्थळी दाखल झाली परंतु दुचाकी स्वार हा जागेवरच गतप्राण झालेला होता.लक्झरी बस ड्रायव्हर ने बस सोडून धुम ठोकली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *