प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या सरपंच बनल्या
किर्तनाच्या क्षेत्रात नावाजलेलं नाव असलेले प्रसिद्ध हभप निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर हे शशिकला पवार यांचे जावई असल्यानं त्याचाही प्रभाव या निवडणुकीवर निश्चित दिसून आला आहे. इंदुरीकर महाराज ग्रामीणभागात आपल्या खास विनोदी शैलीतील किर्तनासाठी ओळखले जातात.
संगमनेर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. यामध्ये राज्यातील सर्वाच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पहायला मिळते आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्ती या निवडणुकीच्या निकालामुळं चर्चेत आल्या आहेत
यांपैकी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या सरपंच बनल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीत शशिकला पवार या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षांकडून ही सरपंचपदाची निवडणूक लढवलेली नाही, तर अपक्ष म्हणून त्यांनी सरपंचपदासाठी अर्ज भरला आणि ग्रामस्थांनी त्यांच्यावर पूर्णतः विश्वास दाखवला आहे.