सात लाख पन्नास हजार रुपयाच्या न वटलेल्या धनादेशाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
सात लाख पन्नास हजार रुपयाच्या न वटलेल्या धनादेशाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
आष्टी प्रतिनिधी :- आष्टी न्यायालयात श्री अशोक श्रीधर पारठे रा.खडकवाडी तहत मोराळा ता.आष्टी जि.बीड या ऊसतोडणी मुकादमाने लक्ष्मण अशोक काळे रा.फत्तेवडगाव ता.आष्टी यांचे विरुद्ध एन. आय. ऍक्ट 138 प्रमाणे समरी फौजदारी केस नं.401/2016 हा खटला दाखल केला होता. फिर्यादीने आरोपीस ऊसतोडणी व वाहतुकीसाठी सन 2013 ते 2014 या गळीत हंगामा करिता उचल सात लाख पन्नास हजार रुपये दिले होते परंतु आरोपी फिर्यादी कडे कामास गेला नाही. म्हणून आरोपीने उचल घेतलेली रक्कम फिर्यादीस देण्यासाठी आरोपीने त्याच्या खात्याचे धनादेश क्रमांक 469971 रक्कम रुपये तीन लाख दिनांक 30/08/2016 रोजी दिला व दुसरा धनादेश क्रमांक 469972 रक्कम रुपये चार लाख पन्नास हजार दिनांक 22/09/2016 रोजी दिला. दोनी धनादेश अनादरीत (बाउन्स) झाल्यामुळे फिर्यादीने आरोपी विरुद्ध खटला दाखल होता. सदर खटल्यात मा. न्यायालयाने फिर्यादी व आरोपी तसेच साक्षीदारांची साक्ष नोंदवून व फिर्यादी व आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद एकून आष्टी न्यायालयाचे मा.न्यायाधीश एम. के. पाटील साहेब यांनी 03/12/2022 रोजी सदर खटल्याचा निकाल देऊन आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ऍड बापूसाहेब भास्करराव गर्जे यांनी आरोपीची बाजू अत्यंत प्रभावी पणे मांडली यामुळे त्यांचे आष्टी वकील संघांचे अध्यक्ष ऍड तांदळे, व आष्टी वकील संघातील सन्मानीय सदस्य यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ते ऊसतोडणी कामगाराला न्याय मिळवून देण्याकरिता नेहमी अग्रेसर असतात.