रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या वारंवार दिलेल्या धमक्यांमुळे अणुबॉम्बच्या वापराची भीती बळावली आहे. साहजिकच या जैविक अस्त्रांचा वापर मानवजातीसाठी अत्यंत घातक ठरेल. त्याचबरोबर बाबा वेंगा यांच्या मते, २०२३ मध्ये एलियन्स पृथ्वीवर येऊ शकतात.
प्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा यांनी २०२३ (Baba Vanga Prediction for २०२३) सालासाठी काही मोठ्या भविष्यवाण्या केल्या आहेत. या भविष्यवाण्या थरकाप उडविणाऱ्या आहेत.
बाबा वेंगा यांनी काही दशकांपूर्वी केलेल्या भाकितानुसार २०२३ मध्ये देशात आणि जगात अनेक मोठ्या घटना घडू शकतात.
हा अंदाज खरा ठरल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. बाबा वेंगाच्या या भाकितांमध्ये पृथ्वीवर सौर वादळे येणे, पृथ्वीवर एलियन्सचे आगमन आणि अण्वस्त्रांचा वापर यांचा समावेश आहे. बाबा वेंगा यांनी २०२३ या वर्षासाठी कोणती भविष्यवाणी केली आहे हे जाणून घ्या.
बाबा वेंगा यांच्या मते, २०२३ मध्ये पृथ्वीवर एक धोकादायक सौर वादळ येऊ शकते. हे वादळ असे असेल की त्यामुळे पृथ्वीवर प्रचंड विध्वंस होऊ शकेल आणि असे वादळ याआधी कधीच पाहिलेले नसेल. यानंतर बाबा वेंगा यांनी पुढील वर्षात २०२३ मध्ये अणुस्फोट होण्याची धोकादायक भविष्यवाणीही केली आहे.