ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्ध संपवण्यासाठी मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी – युक्रेन


रशिया युक्रेनच्या युद्धाचे तीव्र पडसाद जगभरात उमटत आहेत. अशातच आता युक्रेनने भारताविषयी संताप व्यक्त केला आहे. भारताचं कृत्य हे नैतिकदृष्ट्या चुकीचं असल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे.
भारत कमी किमतीत रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि त्यावरुनच युक्रेनने आता भारतावर निशाणा साधला. मात्र आपण स्वतःचं हित आधी पाहू, असं आधीच भारताने स्पष्ट केलं होतं. पण तरीही युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी हे कृत्य नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचं सांगितलं आहे. आम्ही दररोज मरतोय आणि भारत स्वस्तात तेल खरेदी करण्याची संधी घेतोय, अशा शब्दात दिमित्रो यांनी संताप वयक्त केला आहे.

दिमित्रो कुलेबा यांनी रशियातून स्वस्त तेल घेण्याच्या भारताच्या भूमिकेवर टीका केली आहे. आणि भारताने युक्रेनकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहावे, अशी अपेक्षाही वयक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्ध संपवण्यासाठी मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, या विषयावर आवाज उठवून भारताचे पंतप्रधान बदल घडवून आणू शकतात, असा विश्वासही युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *