उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये एक अजबच घटना घडली आहे. घरामध्ये लेकीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना आई प्रियकरासोबत पळाली आहे.
एवढंच नाही तर सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले आहेत. हरिद्वार जिल्ह्यातील मंगलौर कोतवाली परिसरात ही हैराण करणारी घटना घडली आहे. मुलीच्या लग्नाच्या बरोबर दहा दिवस आधी आई तिच्या प्रियकरासह फरार झाली आहे. यासोबतच ती लग्नासाठी केलेले दागिने घेऊन पळून गेली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय महिलेच्या मुलीचं लग्न होतं. पण त्याआधीच ती आपल्या प्रियकरासह पळून गेली आहे. लग्नासाठी घरात असलेले लाखो रुपये आणि दागिने घेऊन ती गेली. महिलेच्या पतीचं एका वर्षापूर्वी निधन झालं असून तिला चार मुलं आहेत. 14 डिसेंबरला मोठ्या मुलीचं लग्न असल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं.
लग्नासाठी खास पाहुणेमंडळी देखील आले आहेत. जोरदार तयारी सुरू आहे. असं असताना शनिवारी रात्री महिला आपल्या कुटुंबाला सोडून अचानक गायब झाली. कुटुंबीयांना तिच्या प्रियकराची देखील माहिती मिळाली. त्याची चौकशी केली असता तो देखील फरार असल्याचं समजलं. तसेच घरातून लाखो रुपये आणि लग्नासाठी केलेले दागिने देखील गायब असल्याचं दिसलं. यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
मंगलौर कोतवालीचे एसएचओ राजीव रौथान यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिचा प्रियकर हे शनिवारी रात्रीपासून फरार आहेत. महिलेच्या मुलाचं 14 डिसेंबरला लग्न होतं. ती लग्नासाठी केलेल दागिने घेऊन पळून गेली आहे. महिला आणि तिचा प्रियकर हे एकाच ठिकाणी काम करायचे. त्यांनी पळून जाऊन लग्न केल्याची पोलिसांना शंका आहे. दोघांनाही शोधण्याचं काम सध्या सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.