पतीशिवाय इतर कोणाशीही संबंध नव्हते. तरीही तिला आपल्या बाळाची डीएनए टेस्ट केल्यावर धक्का बसला
मुंबई : कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाचे एकापेक्षा जास्त व्यक्तींशी संबंध असणे ही नवीन गोष्ट नाही. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात एकाच महिलेच्या मुलांमध्ये वेगवेगळ्या वडिलांचा डीएनए आहे.
मात्र यामागे वैध कारणही असतं. अशा प्रकरणांमध्ये महिलांचे एकापेक्षा जास्त पुरुषांशी संबंध असल्याचे किंवा पती आणि प्रियकर दोघांसोबतही संबंध असल्यामुळे मुलांमध्ये वेगवेगळ्या वडिलांचा डीएनए आढळून येतो. पण एक महिला अशी आहे जिचे तिच्या पतीशिवाय इतर कोणाशीही संबंध नव्हते. तरीही तिला आपल्या बाळाची डीएनए टेस्ट केल्यावर धक्का बसला.
आपली ओळख लपवून या महिलेनं सांगितलं की, तिने आपल्या एका मुलीची डीएनए चाचणी केली. ज्याचा रिझल्ट पाहून तिला धक्काच बसला. डीएनए चाचणीची गरज त्या महिलेच्या लक्षात आली कारण तिची मुलगी तिच्या इतर मुलांपेक्षा वेगळी दिसत होती. याचं कारण जाणून घेण्यासाठी महिलेने तिची डीएनए चाचणी केली होती, परंतु तिला हे माहिती नव्हतं की या चाचणीमुळे तिला इतका मोठा धक्का बसेल.
मुलीच्या डीएनएमध्ये वडिलांचा अंश आढळला नाही. या महिलेने लग्नानंतर पतीशिवाय इतर कोणाशीही संबंध ठेवले नसल्याचं सांगितलं, तरीही तिच्या एका मुलीमध्ये वडिलांचा डीएनए आढळून आला नाही. या मुलीची आई मात्र तीच आहे. पण वडिलांचा डीएनए बाकीच्या मुलांमध्ये सारखाच होता, पण एका मुलीत तो आढळला नाही.
डीएनए अहवालाच्या धक्कादायक निकालांनी महिलेला इतका त्रास झाला की तिने सोशल मीडियावर तिची व्यथा शेअर केली आणि सांगितलं की तिच्या पतीला भेटल्यानंतर तिचे इतर कोणाशीही संबंध नव्हते. अशा स्थितीत मुलीचा डीएनए वेगळा निघाल्याने तिला मोठा धक्का बसला आहे.
महिलेची व्यथा जाणून अनेक युजर्सनी आपलं मत मांडत माहिती दिली. एका युजरने लिहिले की, मी महिलेच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतो, कारण काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मुलांचा डीएनए फक्त पालकांपैकी एकाचाच असण्याची शक्यताही आहे.
जे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. या महिलेने घानाचे प्रसिद्ध फेसबुक इन्फ्यूएन्सर डेव्हिड बॉन्ड्स एमबीर यांना या गोष्टी सांगितल्या. यानंतर महिलेचं नाव उघड न करता त्यांनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर माहिती दिली. यानंतर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. यामुळे अनेक युजर्सनी महिलेची चिंता दूर करण्यासाठी तिला याबाबतची महत्त्वाची माहिती दिली. अनेकांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत