उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधील एका हॉटेलमध्ये पतीने आपल्या पत्नीला तिचा प्रियकर असलेल्या सरपंचासोबत रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे.
पतीने आपल्या मित्रांसोबत भर रस्त्यात या दोघांना चोपही दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. सरपंचाला होत असलेली मारहाण पाहून घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर, पतीने या दोघांनाही पकडून जवळच्या पोलीस चौकीत नेले. आता पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.
हिचे हे पहिलेच कृत्य नाही. तर… –
पतीचे म्हणणे आहे की, माझ्याच विरोधात गुन्हा दाखल करून ही माझ्याच घरात राहते. हिचे हे पहिलेच कृत्य नाही. तर ही दर दुसऱ्या दिवशी त्याच्यासोबत गायब होते आणि पाच सात तासांनंतर घरी परतते. आज मी माझ्या मित्रांना हिच्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते. मित्रांनी सांगितले, की ती हॉटेलमध्ये गेली आहे. यानंतर मी तेथे जाऊन हॉटेलबाहेर अडीच तास तिचा वाट पाहत होतो. गेल्या काही दिवसांपासून हीचे असेच सुरू आहे. मी जेव्हा, जेव्हा हिच्या जवळ जातो, तेव्हा मला मरायची धमकी देते. म्हणते की तुम्हाला अडकवून टाकेन.
पत्नी म्हणाली, मी सरपंचाजवळ जाताच त्यांनी… –
यासंपूर्ण प्रकारासंदर्भात बोलताना पत्नीने म्हटले आहे की, पती मला घरूनच सोबत घेऊन आला आहे. हे शक्यतो, मुंबई आणि दिल्लीतच राहतात आणि म्हणत आहेत, की चल आता खटला संपवू यात. तेवढ्यात, हॉटेलजवळ सरपंच दिसले, तेव्हा ते म्हणाले, की जा आणि खटला कसा संपवता येईल हे सरपंचांना विचारून ये. यानंतर मी सरपंचाजवळ जाताच त्यांनी पकडे आणि मारहाण करायला सुरुवात केली.
प्रियकर म्हणाला… –
यासंदर्भात बोलताना प्रियकर म्हणाला, माझ्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले आहे. यो दोघांमध्ये खटला सुरू आहे. त्यांना त्यांच्या पतीनेच बोलावले होते. यो लोकांनी पूर्वीही आपल्यावर खोटा आरोप केला आहे. त्यांनी बोलावून हाणामारी करायला सुरुवात केली. जे आरोप संबंधित महिलेचा पती करत आहे, ते चूकीचे आहेत. ती आपली प्रेयसी नाही.
आमचा व्यवसाय आहे… –
या प्रकरणावर बोलताना, या लोकांच्या नावाने रूम बुक होती. हे लोक तीन तास येथे राहिले. आमचा व्यवसाय आहे. आम्ही निश्चित नियमानुसार तो चालवतो. आमचे नियम आणि अटी पूर्ण करून जे कुणी आम्हाला रूम मागेल आम्ही त्याला रूम भाड्याने देतो.
यासंदर्भात बोलताना नीरिक्षक रवी रॉय म्हणाले, पतीकडून तक्रार आली आहे, की सरपंचाने नौकरीचे आमीष दाखवून माझ्या पत्नीवर बलात्कार केला. तर, पत्नीने हे संपूर्ण आरोप फेटाळून लावले आहेत. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.