ताज्या बातम्या

2023 सालापर्यंत मानव चंद्रावर ( Moon ) राहू आणि काम करु शकेल.


अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या (NASA) शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, 2023 सालापर्यंत मानव चंद्रावर ( Moon ) राहू आणि काम करु शकेल.
अंतराळात ( Space ) अनेक रहस्य आहेत. ही उलगडण्यासाठी अनेक अवकाश संशोधन संस्था प्रयत्न करत आहेत. तसेच पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांवर मानवाला राहता येईल का याबाबतही संशोधन सुरु आहे. त्यातच आता नासाच्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, 2023 पर्यंत मानव चंद्राच्या पृष्ठभागावर राहू शकेल. आर्टेमिस-1 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दिशेने सोडण्यात आलेल्या ओरियन स्पेसक्राफ्ट कार्यक्रमाचे प्रमुख हॉवर्ड हू यांनी सांगितलं की, आम्ही पुढील आठ वर्षांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर माणसांना पाठवणार आहोत. हे लोक तिथे जाऊन वैज्ञानिक प्रयोग करतील.

‘2030 पर्यंत मानव चंद्रावर राहू शकेल’

नासाने अलीकडेच आपल्या शक्तिशाली स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) रॉकेटद्वारे ओरियन अंतराळयान चंद्राच्या दिशेने पाठवलं आहे. ओरियन अंतराळयान सध्या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. या उपग्रहाचं प्रक्षेपण अनेकवेळा पुढे ढकललं गेलं होतं, त्यानंतर गेल्या आठवड्यात ते लाँच करण्यात आलं. सुमारे 50 वर्षांनंतर नासा चंद्राच्या दिशेने मानवी मोहीम सुरू करत आहे. सध्या जे ओरियन अंतराळयान चंद्राभोवती फिरत आहे, त्यामध्ये मानव नाही. पण त्याच अंतराळयानातून भविष्याच मानवाला चंद्रावर पाठवलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
चंद्रावरून मंगळावर रॉकेट लाँच करण्याचा विचार

नासाकडून सध्या ओरियन अंतराळयानाची चाचणी सुरु आहे. या चाचणीमध्ये ओरियन अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचून, चंद्राला प्रदक्षिणा घालून पुन्हा पृथ्वीवर सुखरुप परत येईल का हे तपासलं जात आहे. या अंतराळयानातून भविष्यात अंतराळयात्रींना चंद्रावर पाठवण्याची नासाची योजना आहे. जर ही मोहिम यशस्वी झाली तर 1972 नंतर पहिल्यांदा मानव चंद्रावर पाऊल ठेवेल. या अंतराळयात्रींमध्ये पुरुष आणि महिला यात्रींचा समावेश असेल. अंतराळयात्रींना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं जाईल. हे अंतराळयात्री चंद्रावरील पाणी आहे का शोधलं जाईस. जर चंद्रावर पाण्याचे स्रोत सापडले तर चंद्रावरून मंगळावर रॉकेट लाँच करता येईल.

चंद्राचा वापर पृथ्वी आणि मंगळ ग्रह यांच्यामधील दुवा

याचा अर्थ असा की, चंद्राचा वापर पृथ्वी आणि मंगळ ग्रह यांच्यामधील दुवा म्हणून केला जाईल. मानवाला चंद्रावर राहता यावं यासाठी हे पहिलं पाऊल असल्याचं हॉवर्ड हू यांनी सांगितलं आहे. चंद्रावर कायमस्वरूपी राहण्यासाठी मानवाला राहण्याची जागा बनवावी लागेल. यासाठी अनेक प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग करावे लागतील. जर आपल्याला या प्रयत्नात यश मिळालं तर आपण चंद्रावर मानवी वसाहत तयार करु शकू.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *