औरंगाबाद : राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यातून हत्या, आत्महत्येच्याही घटना समोर येत आहेत.
यातच आता औरगाबादमधूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मानलेल्या मामाने 22 वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – ही संतापजनक घटना गंगापूर तालुक्यातील पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे घडली. या घटनेनंतर आरोपी रामहरी भागण चिकने (वय 35, रा.
दायगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याप्रकरणी आरोपी रामहरी भागण चिकने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा संतापजनक प्रकार 24 नोव्हेंबरला घडला आहे. यानंतर तो 26 नोव्हेंबरला उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळाला पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे व त्यांची टीमने भेट दिली. यानंतर आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.