क्राईमताज्या बातम्यामुंबई

महिलेला फुटबॉल सारखं हवेतच उडवलं व्हिडीओ पाहून घाम फुटेल


मुंबई : रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल
हे व्हिडीओ बऱ्याचदा हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एका घटनेचा व्हिडीओ आला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. क्षणार्धात असं काही घडलं की ज्यामुळे चुक नसताना एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे.

खरंतर रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना आपण नेहमीच सावध राहिले पाहिजे, कारण कधी काय होईल आणि कोणतं संकट कुठुन येईल हे सांगणं कठीण आहे. तसेच कितीही खबरदारी घेतली तरी देखील बऱ्याचदा दुसऱ्यांच्या चुकीमुळे देखील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
खरंतर ही महिला रस्त्याच्या कडेला उभी आहे. तेथे भरधाव वेगाने गाड्या धावत आहेत. त्यामुळे महिला गाड्यांना सिग्नल लागण्याची वाट पाहात होती. तेव्हा काही वेळातच गाड्यांना सिग्नल लागला.

तेव्हा एक कार देखील थांबली. हे पाहून ही महिला रस्ता ओलांडू लागली. पण बाजूने येणाऱ्या कारला सिग्नल कळलाच नाही आणि या कारने थेट या महिलेला फुटबॉल सारखं हवेतच उडवलं. काही सेकंदांचा हा व्हिडिओ खरंच धोकादायक आणि हृदयद्रावक आहे.

नेटकऱ्यांना देखील हा व्हिडीओ पाहून घाम फुटला आहे. तुम्ही आधी हा व्हिडीओ पाहा, तुम्हाला नक्की काय घडलं हे लक्षात येईल
खरंतर या अपघातात कार चालकाची चुक तर आहेच. पण महिलेनं देखील रस्ता ओलांडताना इकडे-तिकडे पाहिले असते, तर लांबून येणाऱ्या संकटाची तिला आधीच चाहूल लागली असती, ज्यामुळे कदाचित तिचे प्राण वाचू शकले असते. पण ही गोष्ट महिलेला अगदी शेवटच्या क्षणाला कळली होती आणि तो पर्यंत ही कार महिलेच्या इतक्या जवळ येऊन पोहोचली होती की काही विचार करायच्या आत या कारने महिलेला थेट हवेत उडवलं.

हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहाणारा प्रत्येक जण हा अपघात पाहून थक्क झाला आहे. हा व्हिडीओ GoreCenter.com नावाच्या अकाउंटवरुन शेअर केला गेला आहे. ज्यामध्ये हा व्हिडीओ रशियातील असल्याचे सांगितले आहे. तसेच व्हिडीओ शेअर करताना दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मृत्यू झाला आहे. या व्हिडीओला एक उदाहरण म्हणून घ्या आणि तुम्ही देखील रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना काळजी घ्या


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *