दोन वर्ष देशासह जगात कोरोनाने धुमाकूळ घातला. अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. अनेक देशांमध्ये अद्यापही कोरोनाचे संकट टळलेलं नाहीये.
अशातच आता पुन्हा एकदा एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांना चीनच्या वटवाघळांमध्ये नवीन विषाणू सापडला आहे. हा विषाणू कोरोनासदृष्य असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे. हा विषाणू कोरोनाप्रमाणाचे माणसांमध्ये पसरू शकतो.
तसेच तो कोरोना इतकाच घातक असल्याचं देखील शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ही नवी माहिती जगासाठी धोक्याची घटा ठरण्याची शक्यता आहे. 149 वटवाघळांचे नमुने याबाबत मिरर या ब्रिटीश वृत्तपत्रात माहिती देण्यात आली आहे. मिररने केलेल्या दाव्यानुसार म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या चीनच्या युनान प्रांतात चिनी आणि ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी 149 वटवाघळांचे नमुने घेतले.
या नमुन्यांच्या अभ्यासामध्ये त्यात पाच विषाणू आढळून आले आहेत. हे विषाणू माणव आणि प्राण्यांसाठी धोकादायक असून, ते कोरोना विषाणू प्रमाणेच रोग पसरवू शकतात असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या विषाणूंमध्ये BtSY2 नावाचा विषाणू हा SARS-CoV-2 शी संबंधित आहे. याच विषाणूमुळे जगभरात कोरोना सारख्या गंभीर आजाराचा फैलाव झाला होता.
कोरोनासारखे विषाणू अजूनही चीनी वटवाघळांमध्ये फीरत आहेत. त्यामुळे कोरोना सारखा किंवा त्याच्यापेक्षाही भयंकर एखादा आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भीती याबाबत बोलताना सिडनी विद्यापीठातील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ अहवाचे सह लेखक प्रोफेसर एडी होम्स यांनी व्यक्त केली आहे.