ताज्या बातम्या

घशात मासा अडकून अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत


अंबरनाथच्या उलन चाळ परिसरात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

अंबरनाथ पश्चिमेच्या उलन चाळ परिसरात सरफराज अन्सारी हे त्यांच्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांना शहबाज नावाचा ६ महिन्यांचा मुलगा होता. गुरुवारी रात्री शहबाज हा घराबाहेर इतर लहान मुलांसोबत खेळत असताना तो अचानक तडफडू लागला. त्यामुळे इतर मुलांनी शहबाजच्या पालकांना याची माहिती देताच शहबाजच्या पालकांनी त्याला घेऊन आधी एका खाजगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र तिथे त्याला नेमकं काय झालं आहे? याचे निदानच होऊ न शकल्यामुळे त्याला घेऊन त्यांनी उल्हासनगरचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय गाठले. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच शहबाज याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी शहबाज याला तपासले असता त्याच्या घशात मासा अडकल्याचे आणि त्यामुळे त्याचा श्वास रोखला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आले. हा मासा डॉक्टरांनी त्याच्या घशातून बाहेर काढल्याची माहिती शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आपल्या लहान मुलांकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज सुद्धा या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *