डॉ. संतोष मुंडे यांच्याकडून साखरे कुटुंबियांचे सांत्वन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – मांडवा गावातील प्रतिष्ठीत नागरिक व वारकरी सांप्रदायातील व्यक्तिमत्व माणिक यादवराव साखरे यांचे निधन झाले होते. यांच्या दुःखद निधनाबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी मांडवा येथील निवासस्थानी जावुन साखरे कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन केले. तसेच कै.माणिक साखरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
तालुक्यातील मांडवा येथील माणिक यादवराव साखरे यांचे शुक्रवार,दि.18 नोव्हेंबर रोजी वृध्दपकाळाने वयाच्या 97 वर्षी दुःखद निधन झाले होते. धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांनी मोठा सहभाग घेतला होता. वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक व्यक्तिमत्व होते. आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे माणिक यादवराव साखरे सर्वांच्या परिचयाचे होते. शनिवार, दि.19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी साखरे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी सरपंच हरिष नागरगोजे, पत्रकार महादेव गित्ते व इतर उपस्थित होते. विठ्ठल साखरे व साखरे कुटुंबिय उपस्थित होते.