आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करण्यासाठी “पन्नास खोके एकदम ओक्के सरकार “आंदोलन-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बोगस हिवताप प्रमाणपत्र प्रकरणात दोषी आधिका-यांची पाठराखण करणा-या तसेच आरोग्य विभागातील आधिका-यांच्या बदल्यांना स्थगिती निषेधार्थ आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करण्यासाठी “पन्नास खोके एकदम ओक्के सरकार “आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
__
बीड जिल्हा हिवताप कार्यालयातुन हंगामी फवारणी प्रमाणपत्र देणा-या तत्कालीन जिल्हाहिवताप आधिकारी डाॅ.के.एस.आंधळे,कीटक संमाहारक जीवन सानप व वरिष्ठ लिपिक के.के.सातपुते दोषी आढळले असून उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत (S.I.T.) चौकशी करून एकंदरीतच त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत,संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच यांची पाठराखण केल्याबद्दल आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करण्यात यावी तसेच या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२१ नोव्हेंबर सोमवार रोजी “पन्नास खोके एकदम ओक्के सरकार “आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सादेक इंजिनिअर , शेखयुनुसच-हाटकर,शेख मुबीन ,हमीदखान पठाण, जाकीर पठाण,अशोक येडे ,रामनाथ खोड,भिमराव कुटे,प्रविण पवार आदि सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर माहीतीस्तव:-
___
बीड जिल्हा हिवताप आधिकारी कार्यालयातुन हंगामी फवारणी बनावट प्रमाणपत्र घेतल्याप्रकरणी ६९ जणांविरोधात गुन्हा दाखल असुन प्रमाणपत्र देणा-या तत्कालीन जिल्हा हिवताप आधिकारी डाॅ.के.एस.आंधळे,कीटक संमाहरक जीवन सानप व वरिष्ठ लिपिक के.के.सातपुते दोषी आढळले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास शासनाने पत्रही दिले असताना हिंगोलीचे आ.संतोष बांगर यांच्या पत्रावरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्थगिती दिली असून संबधित प्रकरणात भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल आ.तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात यावी तसेच तिनही दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
हिवताप कार्यालयातील २०१७ ते २०२१ कालावधीतील आधिकारी, रजिस्टर,लिपिक यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा
____
हिवताप आरोग्य फवारणी कर्मचारी बनावट प्रमाणपत्र वाटपात कोट्यावधी रूपयांची उलाढाल झाली असून २००६ नंतर जिल्हा हिवताप कार्यालयात हंगामी फवारणी कर्मचारी भरती बंद होती तरीही २०१७ ते २०२१ या कालावधीत हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हा हिवताप कार्यालयातील जावक रजिस्टर ,त्या कालावधीतील आधिकारी व संबधित लिपिक यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आवश्यकता असुन त्यासाठी स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर मोक्का कायद्यांतर्गत संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.
उपसंचालक,सहसंचालक,जिल्हाशल्यचिकित्सक संवर्गातील बदल्यांची स्थागितीचे गौडबंगाल काय???सखोल चौकशी करा
____
दि.११ नोव्हेंबर रोजी उपसंचालक,सहसंचालक व जिल्हाशल्यचिकित्सक संवर्गातील २२ आधिका-यांच्या बदल्यांचे आदेश त्यांनी निर्गमित केले परंतु दुसर्याच दिवशी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यातील कार्यालयातुन या बदल्यांना स्थगिती दिली त्यानंतर लगेचच मुंबई येथील संबधित उपसंचालक कार्यालयातुन बदली झालेल्या आधिका-यांच्या “मूव्हमेंट ऑर्डर “काढण्याच्या सुचना देण्यात आल्या. दोन दिवसात नेमकं काय घडलं याची सखोल चौकशी करण्यात यावी.