छतरपूर : वेदांनी बैलाला धर्माचा अवतार मानले आहे. वेदांमध्ये गायीपेक्षा बैलाला अधिक मौल्यवान असल्याचे म्हटले जाते. दुसरीकडे, जेव्हा नंदी बैलाचा विचार केला जातो, तेव्हा तो भगवान शिवाच्या प्रमुख गणांपैकी एक आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बुंदेलखंडमधील केदारनाथ धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या जटाशंकर धाम येथील एका नंदी बैलाचे निधन झाले. यानंतर या नंदी बैलाचे हिंदू विधींनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
तीन शिंगे आणि तीन डोळे असलेल्या नंदी बैलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. मंदिर समितीच्या सदस्यांनी नंदी बैलाचा अंत्यसंस्कार विधींनुसार ब्राह्मणांच्या उपस्थितीत मंत्रपठण करण्याचा निर्णय घेतला. गेली 15 वर्षे नंदी ज्या ठिकाणी बसत असे. त्याच ठिकाणी नंदीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मंदिर समितीने ज्या ठिकाणी नंदी नेहमी बसायचा, त्याच ठिकाणी खड्डा खोदून नंदीची समाधी तयार केली.
हा नंदी बैल 15 वर्षांपूर्वी जटाशंकर येथे फिरत फिरत आला होता. तीन डोळे आणि तीन शिंगांमुळे हा बैल जटाशंकर धाममध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. जेव्हापासून हा बैल याठिकाणी आला. तेव्हापासून लोकांनी त्यांचे नाव नंदी ठेवण्यात आले, जे काही भक्त जटाशंकर धामला येत असत. ते थोडावेळ नंदीजवळ थांबायचे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत होते.
नंदी बैलाच्या मृत्यूनंतर महिलांनी नंदीच्या मृतदेहाजवळ बसून भजन कीर्तन केले. तसेच, ज्या ठिकाणी नंदीला समाधी देण्यात आली आहे, त्या जागेचा समिती स्मृतिस्थळ म्हणून विकास करणार.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या