कृषी महाविद्यालय, आष्टी मधील विद्यार्थ्याची विद्यापीठ संघात निवड
आष्टी : आष्टी येथील श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या खो – खो संघात निवड झाली आहे. आंतरमहाविद्यालयीन खो – खो क्रीडा स्पर्धा २०२२ ह्या आदित्य अन्नतंत्र महाविद्यालय, बीड या ठिकाणी संपन्न झाल्या या मध्ये महाविद्यालायचा संघ सहभागी झाला होता. २४ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा मोहोत्सव २०२२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे ०३/१२/२०२२ ते ०७/१२/२०२२ या कालावधीत संपन्न होणार आहेत या मध्ये श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषि महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी कु. ऋतिक अशोक साठे याची विद्यापीठाच्या खो – खो संघात निवड झाली आहे. त्याला महाविद्यालयातील डॉ. एस. एस. भोसले यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याच्या या निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. भीमराव धोंडे साहेब, सहसचिव डॉ. अजय दादा धोंडे, संचालक श्री. अभयराजे धोंडे, प्रशासन अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळ, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या