सासू आणि सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या देऊन सून प्रियकरासह दागिने आणि रोकड घेऊन फरार
शाहजहांपुर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. दिवसेंदिवस धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सासू सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या देऊन घरातून लाखोंचे दागिने चोरुन आपल्या प्रियकरासोबत एक तरुणी फरार झाली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये सुनेचा अनोखा पराक्रम समोर आला आहे. सासू आणि सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या देऊन सून प्रियकरासह पळून गेली.
इतकेच नाही तर सासूच्या कपाटाच्या चाव्या काढून सुमारे साडेचार लाख रुपयांचे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख घेऊन फरार झाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सून आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या प्रेमी युगुलाकडून घरातून चोरीचे साडेचार लाखांचे दागिने आणि 50 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहे. विवाहित महिला शोभाने चहामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून सासरच्या मंडळींना बेशुद्ध केले.
पती, सासू आणि सासरे बेशुद्ध झाल्यानंतर तिने सासूच्या कपाटाच्या चाव्यातून घरात ठेवलेले 4.50 लाखांचे दागिने आणि 50 हजार रुपये घेऊन आपल्या प्रियकरासह फरार झाली. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनेच्या चार दिवसांनंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. दोघांकडून चोरीचे साडेचार लाखांचे दागिने आणि पन्नास हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
लग्नाच्या आधीपासून होते अफेअर – सून शोभा या जलालाबाद येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. ती बारावीत असताना शाळेत जाण्याच्या बहाण्याने ती प्रियकर एहसानला भेटू लागली. जवळपास 2 वर्षे प्रेमप्रकरण सुरू होते. हा प्रकार घरच्यांना समजल्यानंतर तिचा विवाह कांत नगरातील विकास राठोड याच्याशी झाला.
यादरम्यान त्यांना एक मुलगीही झाली. मात्र, लग्न होऊनही शोभाचे एहसानसोबतचे प्रेमसंबंध संपले नाहीत. ती त्याच्याशी मोबाईलवरून बोलायची. यादरम्यान सासरच्या मंडळींनाही तिच्या प्रेमसंबंधांबाबत कळाले.
त्यामुळे तिला खूप सुनावण्यात आले. यानंतर शोभाने प्रियकरासह पळून जाऊन सेटल होण्याचा निर्णय घेतला. प्रियकराच्या सांगण्यावरून तिने नशेच्या गोळ्या चहामध्ये मिसळून सासू, पती व सासऱ्याला दिल्या. त्यामुळे सर्वजण बेशुद्ध पडले. यानंतर तिने रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या