महाविद्यालयीन मुलीने आरोप केला आहे की तिचे वडील, आजोबा आणि काका गेल्या सहा वर्षांपासून वेगवेगळ्या प्रसंगी तिचा विनयभंग लैंगिक शोषण करत आहेत.तक्रारीच्या अनुषंगाने IPC आणि POCSO कायद्याच्या कलम 376 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
पुणे – पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील धानोरी भागात राहणाऱ्या 17 वर्षीय तरुणीवर तिच्या वडील तसेच काकांनी बलात्कार केल्याची घटना घडली ( Pune Sexually Abused) आहे. तर आजोबांनी देखील विनयभंग (Molestation) केल्याचं उघड झाले आहे.
एका 17 वर्षांच्या महाविद्यालयीन मुलीने तक्रार केली आहे की, तिचे वडील, आजोबा आणि काका गेल्या सहा वर्षांपासून वेगवेगळ्या प्रसंगी तिचा विनयभंग आणि लैंगिक शोषण करत आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने IPC आणि POCSO कायद्याच्या कलम 376 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती विश्रांतवाडी पोलिसांनी दिली आहे.
तिघांविरोधात गुन्हा – याप्रकरणी वडील, चुलता आणि आजोबा या तिघांविरोधात विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वडिलांना अटक करण्यात आली आहे.
वारंवार शारीरीक संबंध – तक्रारदाराचे आई वडिल पुण्यात मोलमजुरी करतात. घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी तक्रारदाराला उत्तर प्रदेशातील आपल्या मुळ गावी रहायला पाठविले होते. २०१६ ते २०१८ या काळात ही मुलगी साधारण १२-१३ वर्षाची असताना मुळगावी ३३ वर्षाच्या चुलत्याने दमदाटी करुन जबरदस्तीने एक वर्षभर तिच्याबरोबर वारंवार शारीरीक संबंध केला. तिचे ७० वर्षाचे आजोबाही तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करुन तिच्याशी शारीरीक चाळे करीत होते. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये ती पुण्यात आईवडिलांकडे आली. तेव्हा तिने आपल्यावरील या अत्याचाराची माहिती चिठ्ठी लिहून वडिलांना कळविली. त्यानंतर तिचे वडिलच तिची आई बाहेर असताना तिच्यावर अत्याचार करु लागले. ५ नोव्हेबर २०२२ रोजी त्याने तिच्या आईला काही कारणास्तव बाहेर पाठवून तिच्यावर अत्याचार केला. कुटुंबातील व्यक्तीकडून तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांमुळे ती शांत राहायची.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या