ताज्या बातम्याबीड जिल्हा

महावितरणच्या सक्तिची वीजबिल वसुलीत, कृषिपंपाचे कनेक्शन तोडण्याच्या निषेधार्थ विजबिलाची होळी आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


महावितरणच्या सक्तिची वीजबिल वसुलीत, कृषिपंपाचे कनेक्शन तोडण्याच्या निषेधार्थ विजबिलाची होळी आंदोलन :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
खरीप हंगामातील पिके अस्मानी अतिवृष्टीत पाण्यात गेली असताना उद्ध्वस्त शेतक-यांना धीर देण्याऐवजी रब्बी हंगामातील पिके ज्वारी,गहु,हरभरा यांचा पेरा पुर्ण झाला असून त्यांच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असतानाच महावितरणच्या सक्तीची विजबिल वसुली करत कृषिपंपाचा विजपुरवठा खंडीत करण्याच्या सुलतानी कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाला असून कुठलीही पुर्व कल्पना न देताच वीज खंडित करण्याच्या महावितरणच्या रझाकारी धोरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१४ नोव्हेंबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “वीजबिलाची होळी आंदोलन “करण्यात येऊन महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंदोलनात शेख युनुस च-हाटकर,बळीराम उबाळे, शेख मुबीन,शेख मुस्ताक,नितिन सोनावणे,धनंजय सानप,दिपक बांगर,संजय जायभाये,मिलिंद सरपते,श्रीकांत गदळे सहभागी होते.निवेदन तहसीलदार महसुल जि.प.कार्यालय बीड मनिषा लटपटे यांच्यामार्फत
मुख्यमंत्री,ऊर्जामंत्री,कृषिमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

राज्य अन्न आयोगाचा निर्णय मानण्यास मुजोर महावितरणचा नकार
___
अन्न सुरक्षा कायद्यानुसार मानवाची मुलभुत गरज अन्न पिकवणारा शेतकरी असुन त्याची सुरक्षा ही राज्य व केंद्र सरकारची जबाबदारी ठरते. त्यामुळे महावितरणचा कृषिपंपाचा विजपुरवठा खंडित करता येणार नाही परंतु महावितरणच्या मुजोर आधिका-यांकडुन आम्हाला बंधनकारक नसुन थकबाकी दिल्याशिवाय खंडित विजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे आवर्जून सांगितले जात आहे त्यामुळेच शेतकरी भयभीत झाला आहे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *