हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील एका वीस वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.प्रकरणात गोरेगाव पोलिस स्टेशनला पतीसह चार जना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासरच्या मंडळीकडून आरती उर्फ अंजलीला माहेरवरून हुंड्यातील राहिलेले 5 लाख रुपये घेऊन ये अशी मागणी केली जात होती व घरातील सर्वांनी मिळून तिला घरात उपाशी ठेवून मारहाण केली.तिचा मानसिक व शारीरिक छळ केला या जाचाला कंटाळून आरतीने आजेगाव येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेतला.
मुलाचे वडील लोडजी कुंडलिक पळसकर रा .झोडगा.जिल्हा वाशिम यांच्या फिर्यादीवरून दिरामदास धोंडीबा गोरे पती धोंडीबा राजाराम गोरे सासरा, कांताबाई धोंडीबा गोरे सासु,दीपाली धोंडीबा गिरे नंदन या चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
चोवीस तासानंतर गुन्हा दाखल
सदर घटनेनंतर विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी गोरेगाव पोलिस ठाणे गाठत आरोपीला तत्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रेत शवविच्छेदनासाठी गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. या दरम्यान विवाहितेच्या नातेवाईकांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता.