मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर अत्याचार केल्यानंतर पीडित महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नागपूर जिल्ह्यात समाेर आली आहे.प्रकरणी पाेलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेचा नागपुरातील मेडिकल रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. पतीच्या मित्राने एकतर्फी प्रेमातून ही घटना केल्याची माहिती समोर आली आहे.
पतीचा आणि मुलाचा अपघात घडवून खून करण्याची धमकी देऊन संशियत आरोपीने मित्राच्या पत्नीचे अपहरण केले. तिला जंगलात नेेलं. तेथे तिच्यावर अत्याचार करुन पुन्हा घरी नेऊन सोडले.
धक्याने घाबरलेल्या पीडित महिलेने घरी जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पाेलिसांनी सतीश जौंजाळकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत हेमंतकुमार खराबे (पोलीस निरीक्षक. मौदा पोलीस स्टेशन) म्हणाले, संशयित आरोपी सतीश हा चालक आहे. ताे पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे. पीडित महिलेने या प्रकरणी मौदा पोलीस ठाण्यात सतीश याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.