क्राईमताज्या बातम्या

विक्रतीचा कळस महिलांच्या शरीराचे तुकडे करुन खाल्ले


कोचीः केरळमधी दोन महिलांच्या झालेल्या हत्येमुळे त्या राज्यासह देशभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जात पोलिसांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

या झालेल्या नरबळीच्या (black magic) हत्येमुळे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Chief Minister Pinarayi Vijayan) यांनीही शोक व्यक्त केला आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ज्या महिलांची हत्या केली गेली होती.

हत्या करुन शरीराचे तुकडे करुन खड्यात पुरले होते. मात्र ज्या खड्यात महिलांच्या शरीराचे तुकडे करुन पुरले होते, त्याच खड्यातून आता तीन मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या महिलांची हत्या केल्यानंतर मारेकरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर महिलांच्या शरीरातील मासाचे तुकडे खाण्याचा किळसवाणा प्रकार केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणातील ज्या व्यक्तींनी महिलांची हत्या केली आहे, ती व्यक्ती फेसबुकच्या माध्यमातून लोकांचा शोध घेत होता.

कोची शहराचे पोलीस आयुक्त सी. एच. नागराजू यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ज्या दोन महिलांची हत्या केली गेली आहे, त्या महिलांच्या शरीराचे अवयव आम्ही जप्त केले आहेत.

ते तपासणीसाठी पाठवण्यात आले असून महिलांची हत्या करुन, शरीरापासून अवयव वेगळे करुन आरोपींनी ते शिजवून खाल्याचा प्रकार त्यांनी केल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यापुढील तपास अजून सुरु असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी शफीबाबत पोलीस आयुक्त नागराजू यांनी सांगितले की, शफी हा विकृत असल्यासारखा आहे.

या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचाही शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शफीची फॉरेन्सिक तपासणीसाठी पठाणमथिट्टामध्ये घेऊन गेल्यानंतर तो मुख्य सूत्रधार असल्याचे समजले. त्यानंतर या प्रकरणातील तो मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाल्याचे समजले.

महिलांची हत्या करुन त्यांच्या शरीराचे तुकडे करणारे जो शफी आहे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या व्यक्तींचा शोध घेत होता. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून तो त्यांची हत्या करत होता असंही पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असून हत्या झालेल्या महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे का, त्याचाही शोध घेण्यात येत आहे.

त्यामुळे या प्रकरणातून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *